शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात पाठिमागून येणाऱ्या रिक्षानं धडक दिल्यानं महिलेचा मृत्यू

By विलास जळकोटकर | Updated: April 17, 2023 16:50 IST

ही घटना सोमवारी (दि. १७) पहाटे ५:३० च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज तलाव ब्रीजवरील रोडवर घडली.

सोलापूर : सोरेगावहून सोलापूरकडे दुचाकीवरुन निघालेल्या दोघांना पाठिमागून येणाऱ्या रिक्षानं जोराची धडक दिल्याने यामध्ये रोडवर पडून दोघे गंभीर जखमी झाले. यातील एका महिलेचा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर एकावर उपचार सुरु आहेत. ही घटना सोमवारी (दि. १७) पहाटे ५:३० च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज तलाव ब्रीजवरील रोडवर घडली.

यातील जखमी सुशीला सिद्राम कर्जाळ (वय- ५५) व काशिनाथ शिरेप्पा बिराजदार (वय- ५५, दोघे रा. एसआरपी कॅम्प, सोलापूर) हे दोघे सोमवारी पहाटेच्या सुमारास सोरेगावहून शहराकडे दुचाकीवरुन येत होते. त्यांची दुचाकी छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळील ब्रीजच्या रोडवर आली असताना पाठिमागून वेगात येणाऱ्या रिक्षाने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरुन दोघेही खाली पडले. दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागला.अशाही स्थितीत काशिनाथ व सुशीला यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालय रुग्णालय गाठले. यामध्ये सुशीला या बेशुद्धावस्थेत होत्या.

यातील सुशीला यांच्यावर उपचार सुरु असताना डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ६:४० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसरे जखमी काशीनाथ बिराजदार यांच्यावर उ्पचार सुरु आहेत. सिव्हील चौकीत या अपघाताची नोंद झाली आहे.