शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

वाटेत थांबलेल्या पिकअपला टेम्पोची धडक; देवीची ज्योत घेऊन थांबलेले १२ भाविक गंभीर जखमी

By appasaheb.patil | Updated: October 3, 2024 12:06 IST

ही घटना आज गुरुवार पहाटेच्या सुमारास विजापूर - गुहागर मार्गावरील जांभुळवाडी पाटी (ता जत.जि.सांगली) येथे घडली आहे.

अरुण लिगाडे 

सांगोला : कोल्हापूर येथून भवानी ज्योत घेऊन येताना वाटेत थांबलेल्या पिकअपला भरधाव जाणाऱ्या टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात डिकसळ (ता सांगोला) येथील श्री लक्ष्मी देवी नवरात्र उत्सव मंडळाचे १२ तरुण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज गुरुवार पहाटेच्या सुमारास विजापूर - गुहागर मार्गावरील जांभुळवाडी पाटी (ता जत.जि.सांगली) येथे घडली आहे.

दरम्यान, जखमींवर जत येथील खाजगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र अपघातानंतर तरुणांनी सकाळी ७ वाजण्यापूर्वीच भवानी ज्योत गावात घेऊन दाखल झाले आहेत. डिकसळ येथील लक्ष्मी देवी नवरात्र उत्सव मंडळाचे सुमारे १५० तरुण भवानी ज्योत आणण्यासाठी बुधवारी चारचाकी दुचाकीवरुन कोल्हापुर येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात गेले होते. गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास ज्योत घेऊन परत येताना पिकअप जांभुळवाडी पाटी याठिकाणी थांबली होती, त्यादरम्यान नागजकडून विजापूर कडे जाणाऱ्या टेम्पोने पिकअपला पाठीमागून धडक दिल्याने  हा अपघात घडला दरम्यान अपघात घडल्यानंतर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, माजी सरपंच चंद्रकांत करांडे, पत्रकार नाना हालगंडे यांनी जखमींना तातडीने उपचाराकरिता दवाखान्यात नेऊन मदत केली.