शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

कांद्याच्या काट्यावरून यार्डात गोंधळ; पोलिस अन् कामगारांमध्ये बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 12:50 IST

सोमवारी, पावणेआठ वाजता हमाल कामगारांनी सकाळी आठला काटा करण्याचा निर्णय कोणाला विचारून घेतलात, असा सवाल करीत गोंधळ सुरू केला.

विठ्ठल खेळगी

सोलापूर : कांदा चोरी रोखण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने पहाटेऐवजी सकाळी आठ वाजता कांदा काटा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात गोंधळ करीत पहाटे पाच वाजताच काटा करण्याची मागणीचा जोर लावला. सुमारे तासभर गोंधळ सुरू होता.

सोमवारी, पावणेआठ वाजता हमाल कामगारांनी सकाळी आठला काटा करण्याचा निर्णय कोणाला विचारून घेतलात, असा सवाल करीत गोंधळ सुरू केला. दरम्यान बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सकाळी साडेदहा वाजता पोलिसही घटनास्थळी पोहोचले. समजूत काढत असताना पोलिस आणि कामगारांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर चेअरमन आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी फोनवरून झाल्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी चार वाजता व्यापारी आणि कामगारांची बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर हमाल कामगार शांत झाले.

लिलावास दोन तास विलंबदररोज अकरा वाजता कांदा लिलाव होतो. सोमवारी या गोंधळामुळे लिलावास दोन तास विलंब झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर सकाळी अकरा वाजता कामगारांनी काटा करण्यात सुरुवात केली. त्यानंतर व्यापारी एक वाजता लिलाव करण्याचा निर्णय घेतला.

पहाटे कांदा चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे कांदा काटा सकाळी आठ वाजता करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी सकाळी हमाल कामगारांनी गोंधळ करीत त्याचा विरोध केल्याची माहिती मिळाली. ही बाहेरगावी आहे. चार वाजता चेअरमनांसोबत व्यापारी व कामगारांची बैठक होणार आहे. त्यात तोडगा काढण्यात येईल. -श्रीशैल नरोळे, व्हाईस चेअरमन, बाजार समिती