शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

सोलापूर जिल्ह्यात ९२ टक्के बालकांना पोलिओची लस, छत्रपती सर्वाेपचार रुग्णालयात झाला मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 11:48 IST

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील नागरी ग्रामीण, शहरी भागात ९१ टक्के बालकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. 

ठळक मुद्देया मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरावरुन कुटुंब कल्याणचे सहायक संचालक डॉ. भीमाशंकर जमादार दौºयावरया माध्यमातून ३ लाख १९ हजार ८१६ बालकांना पोलिओची लस देण्यात आलीउर्वरित बालकांना ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१८ या तीन दिवसात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी, वाडीवस्ती, ऊसतोड टोळी, वीटभट्टी आदी ठिकाणी जाऊन लस देण्यात येणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९  : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी जिल्ह्यातील नागरी ग्रामीण, शहरी भागात ९१ टक्के बालकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी लसीकरण मोहिमेसंदर्भात बैठका घेऊन अधिकाºयांना मार्गदर्शन केले होते. या मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज सर्वाेपचार रुग्णालयात जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहायक संचालक डॉ. अभिमन्यू खरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अणदूरकर यांनीही बालकांना लस दिली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. मोहन शेगर आदी उपस्थित होते. या मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरावरुन कुटुंब कल्याणचे सहायक संचालक डॉ. भीमाशंकर जमादार दौºयावर आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दूधभाते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुलकर्णी, प्रशासन अधिकारी आरिफ सय्यद, साथरोग अधिकारी डॉ. राजीव कुलकर्णी, अनिलकुमार जन्याराम, जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख आदींनी परिश्रम घेतले. ------------------------तीन दिवस विशेष मोहीमजिल्ह्यात ग्रामीण आणि नागरी भागात ५ वर्षांखालील एकूण ३,६२,४३६ बालके होती. ग्रामीण भागात एकूण २४१० आणि नागरी भागात २१० लसीकरण केंदे्र होती. ९७ मोबाईल टीम, १११ ट्रांझिट टीम स्थापनाही करण्यात आली होती. या माध्यमातून ३ लाख १९ हजार ८१६ बालकांना पोलिओची लस देण्यात आली. उर्वरित बालकांना ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१८ या तीन दिवसात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी, वाडीवस्ती, ऊसतोड टोळी, वीटभट्टी आदी ठिकाणी जाऊन लस देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरdocterडॉक्टर