शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांचे ६० तास परिश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST

सोलापूर : वळसंग-कुंभारी दरम्यान झालेल्या कंटेनर अपघाताला ६० तास उलटल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. जागोजागी थांबलेल्या ...

सोलापूर : वळसंग-कुंभारी दरम्यान झालेल्या कंटेनर अपघाताला ६० तास उलटल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. जागोजागी थांबलेल्या संतप्त जमावाला नियंत्रणात आणले आहे. तसेच जमावाने चोपल्याने जखमी झालेला कंटेनर चालक पी. के. पांडे याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटहून आलेल्या कंटनेरने वळसंग येथे एका वडापावच्या गाडीला धडक दिली. संतप्त जमावाने पाठलाग सुरू केल्यानंतर बिथरलेल्या कंटेनरचालकाने सुसाट वेगात कुंभारीच्या दिशेने निघाला. तो दोड्डी गावच्या रस्त्याला वळणार होता. मात्र, त्याने थेट कुंभारीत वेशीमध्येच गाडी घातली. कुंभारी ते वळसंग दरम्यान सहा वाहनांना चिरडत दोघांचा बळी घेतला. एकजण कुंभारीत वाहनाखाली आला. त्याचाही मृत्यू झाला. ही थरारक घटना रात्री दहा वाजल्यानंतर घडली. या अपघातात सकलेन कुरेशी आणि राेहित चौगुले या दोघांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी दिवसभर ग्रामपंचायती निवडणुकीमुळे वळसंग पोलीस ठाण्याचे कर्मचारी गुरुवारपासून कामात व्यस्त होते. रात्री हा अपघात होताच पोलीस शिपाई अब्दुल रजाक मुल्ला यांना याची माहिती सर्वप्रथम मिळाली. यावेळी पोलीस ठाण्यात असलेले पेालीस कर्मचारी दीपक गाढवे, लक्ष्मण काळजे यांना याची माहिती कळवली. मतपेट्या जमा करण्याचे काम सुरू असताना या पोलिसांपुढे अपघाचे संकट वाढवून ठेवले. मुल्ला यांनी वरिष्ठ अधिका-यांना आणि आपल्या सहकाऱ्यांना अपघातस्थळी धावून येण्याचे आवाहन केले. रात्री १० वाजेपर्यंत पोलिसांची कुमक जमली. कुंभारीजवळ वेशीत कंटेनर अडकल्यानंतर चालक संतप्त जमावाच्या ताब्यात आला. त्याला पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. जमावाला सोलापूरला जाण्यापासून रोखले.

---

आरटीओ अधिकाऱ्याकडून तपासली वाहने

या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक अतुल मोहिते, उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, तहसीदार अमोल कुंभार, प्रांताधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिथे जिथे अपघात झाला तिथे-तिथे संतप्त जमाव वाढत गेला. त्यांच्यावर नियंत्रण आणणे जिकिरीचे होते. पहाटेपर्यंत वाहतूक विस्कळीतच झालेली होती. यावेळी क्रेनला पाचारण केले. या क्रेनच्या मदतीने अपघातातील वाहने ही पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावली गेली. एक कंटेनर, तीन दुचाकी, दोन कार ही वाहने क्रेनच्या माध्यमातून हलवली गेली. आरटीओ अधिकाऱ्यांकडून ही वाहने तपासण्यात आली. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना ६० तास परिश्रम घ्यावे लागले. परिस्थिती नियंत्रणावर आणण्यात पोलीस उपनिरीक्षक स्वामीराव पाटील आणि अजय हंचाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योगदान दिले.

---

घाबरलेला चालक म्हणतोय..मुझे बचाव

अपघातानंतर कंटनेर चालक पी. के. पांडे हा जमावाकडून चोपला गेल्याने जखमी झाला. त्याची प्रकृती गंभीर नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. मात्र, अजूनही घाबरलेल्या अवस्थेत असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. झोपेत तो पोलिसांना मुझे बचाव...मैने गलत काम किया है, मैने जानबुझकर नही किया साब, मुझे बचाव असा बडबडतोय. उपचारानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले.