शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी ५२४ मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे पंढरपूर प्रांत ...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे पंढरपूर प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, स्वप्नील मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, निवडणूक नायब तहसीलदार सुरेश तिटकारे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे. मतदान केंद्राच्या नावात बदल, पूर्वीच्या मतदान केंद्राची इमारत मोडकळीस आल्याने मूळ मतदान केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर साहाय्यकारी मतदान केंद्राच्या ठिकाणी झालेला बदल, नावात झालेला बदल याबाबतची सर्व माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात येणार आहे. यामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर तात्काळ बदल सुचवावेत, असेही प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीसाठी ४२ मतदान केंद्रांच्या नावांमध्ये बदल झालेला असून, पंढरपूर शहर २२, ग्रामीण २, तसेच मंगळवेढा येथील २८ केंद्रांच्या नावात बदल झाला आहे. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो संकलित करण्याबाबत संबंधितांनी बीएलओ नेमून बीएलओंना सहकार्य करावे. ज्यांचे वय १ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे पूर्ण झाले आहे, त्यांनी मतदार नोंदणी करावी, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास कोणालाही मतदार नोंदणी करता येणार नाही, असेही गुरव यांनी सांगितले.

पोटनिवडणूक नि:पक्ष, निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती तयारी केली आहे. या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढल्याने आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध केला जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी यावेळी सांगितले.