शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मनपातील ४३ कर्मचारी बडतर्फ

By admin | Updated: September 2, 2014 16:38 IST

४३ कर्मचार्‍यांना बडतर्फीची कारवाई केल्यानंतर लगेच अनुकंपा यादीवरील ३७ उमेदवारांना आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कामावर घेण्याचे आदेश काढले आहेत.

सोलापूर - ४३ कर्मचार्‍यांना बडतर्फीची कारवाई केल्यानंतर लगेच अनुकंपा यादीवरील ३७ उमेदवारांना आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कामावर घेण्याचे आदेश काढले आहेत. त्यात सविता गुंड, वीरेश स्वामी, सोमनाथ सिद्धगणेश, सूर्यकांत लिंगराज, शिवकुमार उदगिरी, सुजाता चव्हाण, नितीन आलमेलकर, उमेश वाघमारे, बुद्धप्रकाश बनसोडे, बाळू बेळ्ळे, सोमनाथ अंकुशे, राजकिरण अंकम, कपिल शिवशरण, सुहास ननवरे, शशिकांत लोणार, सुनीता व्यवहारे, नागेश चंद्री, बिरूदेव खांडेकर, यशपाल सरवदे, नवृत्ती सोनवणे, दिनेश बनसोडे, रमेश म्हेत्रे, भीमाशंकर कोनाळी, बाबासाहेब कांबळे, किरण भोसले, लक्ष्मण कचरे, आनंद म्हेत्रे, शिवम्मा आवार, नागनाथ कांबळे, केशव उडाणशिवे, शिवकांत दुमडे, परमेश्‍वर वाघमारे, शाम पल्लेलु, सोमलिंग माळी, सिद्धार्थ कांबळे, गौतम लोखंडे, अनंतम्मा सज्जन. महापालिकेचे कर्मचारी मरण पावल्यावर अनुकंपाखाली घेण्यात येणार्‍या सन २00४ पासून प्रतीक्षा यादीवरील या उमेदवारांना एक वर्षासाठी परिविक्षा कालावधीकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. काय आहे हद्दवाढ भरती प्रकरण५ मे १९९२ साली झालेल्या हद्दवाढीत ११ गावे समाविष्ट करण्यात आली. रातोरात कर्मचारी भरती करुन ग्रामपंचायतींनी आपल्याकडे जास्त कर्मचारी असल्याचे बोगस रेकॉर्ड तसेच सेवापुस्तके तयार करून मनपाची फसवणूक केली. २२ वर्षांनंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. मजरेवाडी ग्रामपंचायतीने २१0 तर उर्वरित १0 ग्रामपंचायतींनी आपले ९0 कर्मचारी मनपामध्ये घुसविले आहेत. ३00 पैकी १५0 कर्मचार्‍यांना महापालिकेने नोटिसा बजावून २५ दिवसांच्या आत लेखी म्हणणे मांडण्याबाबत कळविले होते. त्यातील १२५ कर्मचार्‍यांनी लेखी म्हणणे सादर केले असून, त्यांनी दिलेली कारणे योग्य आहेत काय हे विधी विभागाकडून तपासण्यात येत आहे. असे असताना फौजदारी कारवाईच्या भीतीने यात सहभाग असलेले व इतर कर्मचार्‍यांनी २८ ऑगस्टपासून अचानकपणे कामावर दांडी मारली आहे. विभाग क्र. ५ : चावीवाला: मारूती माने, पंडित शेवगार, दत्तात्रय राजमाने, कल्लप्पा मोकाशी, रामचंद्र साळुंके, राजशेखर पाटील, रेवण्णप्पा भोपाळे, श्रीकांत शेवगार, चन्नप्पा हावडे, सुभाष मकणापुरे, म. नौशाद मुजावर, श्रीकांत कोरे, पंडित हत्तुरे, रत्नाकर हुक्केरी, मारूती कांबळे, शिपाई: रेवणप्पा लंगोटे, वायरमन: शंकर थोरात, मजूर: रेवप्पा खुपसंगे, सत्तार बाडीवाले, सादिक हुच्चे, सोमनाथ स्वामी, विभाग: २, चावीवाला: भालचंद्र भोवाळ, महादेव भरळे, निंगम्मा तमशेट्टी, विभाग: ३ चावीवाला: परशुराम हराळे, काशिनाथ गौडगाव, मल्लिकार्जुन मोहोळकर, रेवणसिद्ध माहिमकर, वायरमन: स्वामीराम भावार्थी, मजूर: हणमंत रुद्राक्षी, विभाग: ४, चावीवाला: गौरीशंकर भरले, दयानंद कोळी, वायरमन: यशवंत धायगोडे, लॅम्प लाईटर: चंद्रकांत ख्याडे, मजूर: शिवानंद कडगंची, राजेंद्र कोरे, उमाकांत कोरे. विभाग: ६, सहायक वायरमन: शिवाजी इंगळे, लायटर मदतनीस: वैजिनाथ विजापुरे, विभाग: ७, वायरमन मदतनीस: श्रीमंत कोरे, लॅम्प लायटर: धर्मण्णा हत्तुरे, विभाग: ८ लॅम्प लायटर: गजेंद्र कामशेट्टी. सोलापूर : हद्दवाढ भरतीप्रकरणी महापालिकेने बजावलेल्या नोटिशीला लेखी उत्तर दिल्यावर कारवाईच्या भीतीने अचानक गायब झालेल्या ४३ कर्मचार्‍यांना महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सोमवारी बडतर्फ केले. कारवाई केलेल्यांमध्ये पाणीपुरवठा विभागातील २४ चावीवाले, ७ वायरमनचा समावेश असून, महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. २८ ऑगस्टपासून हद्दवाढ भागातील चावीवाले व वायरमन अचानकपणे कामावरून गायब झाले. पाणी पुरवठय़ावर परिणाम झाल्यावर प्रशासनाच्या निदर्शनाला ही बाब आली. त्यानंतर आयुक्त गुडेवार यांनी सर्व विभागीय अधिकार्‍यांना गैरहजर कर्मचार्‍यांबाबत अहवाल पाठविण्याचा आदेश दिला. वीज व पाणी पुरवठा हा विषय जीवनावश्यक बाबींमध्ये मोडत असल्याने सर्व गैरहजर कर्मचार्‍यांना तातडीने कामावर हजर राहण्याबाबत विभागीय अधिकार्‍यांनी नोटिसा दिल्या. तरीही दोन दिवसांत बरेच जण गैरहजर राहिल्याचे दिसून आले. भ्रमणध्वनीवरून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, घरी माणसे पाठविली तरी संबंधित कर्मचारी आढळले नाहीत. त्यामुळे पर्यायी कर्मचारी लावून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. गैरहजर कर्मचार्‍यांचा रविवारी व सोमवारी अहवाल मागवून आयुक्तांनी त्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये हयगय केल्याप्रकरणी कामावरून बडतर्फ करण्यात येत असल्याचे आदेश काढले. (प्रतिनिधी)