मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी ४१७० कर्मचारी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:21 AM2021-04-17T04:21:48+5:302021-04-17T04:21:48+5:30

पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाकडून केलेल्या तयारीची माहिती सांगण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, ...

4170 staff dispatched to conduct voting process | मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी ४१७० कर्मचारी रवाना

मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी ४१७० कर्मचारी रवाना

Next

पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाकडून केलेल्या तयारीची माहिती सांगण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम उपस्थित होते.

शंभरकर म्हणाले, मतदानाच्या दिवशी २६२० अधिकारी व कर्मचारी, ५५० पोलीस, १००० आरोग्य विभागाचे कर्मचारी, १३१० राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ५२४ मतदान केंद्रांवर मतदान साहित्यांसह सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी हे सुरक्षितपणे पोहोचले आहेत. मतदार, निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी यांच्या सोयीसाठी १५ एप्रिल रोजी सायंकाळी ८ ते १८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जमावबंदी शिथिल केलेली आहे. तसेच बाहेरील राज्यातील किंवा जिल्ह्यातील मतदारांना मतदान करण्यासाठी १५ एप्रिल ते १८ एप्रिल १२ वाजेपर्यंत प्रवास करण्यास सवलत देण्यात आलेली आहे. तसेच ज्यांना पोस्टल मतदान करायचे होते, परंतु करता आले नाही, असे मतदार थेट मतदान केंद्रामध्ये मतदान करू शकतात.

त्याचबराेबर आदर्श आचारसंहिता भंगासंदर्भात ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाहतुकीच्या अनुषंगाने ३३.३४ लाखांचा मुुद्देमाल व रक्कम जप्त करण्यात आली आहे. १५८ परवानाधारकांची शस्त्रे जमा करून घेण्यात आलेली आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी ९४ बसेस, ३ जीप, ३२ टेम्पो ट्रॅव्हलर, ४ ट्रक व इतर ६ अशा १३९ वाहनांचा वापर केल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

कोरोनाची लक्षणे आढळून आलेले मतदार करू शकतात मतदान

कोविड १९ ची लक्षणे आढळून आलेल्या मतदारांना कोरोना नियमाचे पालन करून शेवटच्या एका तासामध्ये मतदान करण्याची परवानगी देण्यात आली. कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी मतदान केंद्राबाहेर प्राथमिक स्वरूपाचे साहित्य ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये ९० हजार मास्क, ८ हजार ५०० फेस शिल्ड, ४ हजार ८०० (२०० एम.एल) सॅनिटाइझरच्या बाटल्या, ५०० प्लस ऑक्सिमीटर, २५०० लीटर हायपोचीओराईट असे साहित्य राखीव ठेवण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

Web Title: 4170 staff dispatched to conduct voting process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.