पंढरपूर: पंढरपूरच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना आषाढी एकादशी दिवशी तब्बल ४ लाख लिटर दुधाची आवश्यकता असते. यामधील ६0 टक्के दूध पुरवठ्याची तयारी जिल्हा दूध संघ व दूध पंढरीने केली आहे तर उर्वरित ४0 टक्के दुधाच्या पुरवठ्यासाठी इतर दूध संघ व तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांवर भाविकांना अवलंबून रहावे लागणार आहे.आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना वेळेत आवश्यक तेवढा दूध पुरवठा व्हावा, यासाठी सोलापूर जिल्हा दूध संघाने २ लाख लिटर दुधाच्या पिशव्यांचे पॅकिंग करून ठेवले आहे. याशिवाय आठ टन पेढा, दोन टन श्रीखंड, २ टन आम्रखंड, एक टन तूप, ३0 हजार पिशव्या सुगंधी दूध तर ५ हजार स्टरनेस दूध बाटल्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. पंढरपूर शहरात होणाऱ्या दूध विक्रीमध्ये ९0 टक्के दूध पंढरी व जिल्हा दूध संघाचा वाटा आहे. त्याचे प्रत्येक चौकात, गल्लीत विक्रेते आहेत. याशिवाय यात्रा कालावधीत इसबावी दूध पंढरीसमोर ६, सांगोला चौक १, अर्बन बँक १, शिवाजी चौक १, रेल्वे स्थानक १ अशा दहा ठिकाणी नव्याने स्टॉल उभारण्यात आले आहेत.
आषाढीसाठी ४ लाख लिटर दुधाची गरज
By admin | Updated: July 5, 2014 00:22 IST