शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

३६ दुकानदारांना दिलासा

By admin | Updated: July 24, 2014 01:26 IST

पुणे उपायुक्तांचा निर्णय : रद्द झालेल्या रेशनदुकानांना तूर्त स्थगिती

अक्कलकोट : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रद्द ठरविलेल्या अक्कलकोट तालुक्यातील ४४ पैकी ३६ रेशन दुकानांना पुणे येथील पुरवठा विभागाच्या उपायुक्तांनी २ आॅगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे़ त्यामुळे रेशन दुकानदारांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे़चार महिन्यांपूर्वी तालुक्यातील मैंदर्गी, दुधनी भागातील तहसील पथकाच्या होम टू होम तपासणीत ४४ रेशन दुकानदार दोषी आढळले होते़ त्या दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होऊन त्यातील ७ दुकानदारांना क्लीन चिट देण्यात आली होती़ उर्वरित ३६ दुकानांचे परवाने रद्द ठरविले होते़ दरम्यान, तपासणी पथकाच्या अहवालानुसार दक्षिण पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा कलमाखाली फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते़ त्यापैकी २२ दुकानदारांना अटक करून त्यानंतर जामीन मिळाला होता़ या निर्णयानंतर दुकानदारांमध्ये खळबळ उडाली होती़ दरम्यान, विधानपरिषद आमदारांमार्फत यावर स्थगिती मिळविण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती़ त्या ३६ दुकानदारांच्या अर्जावर वकिलामार्फत म्हणणे ऐकून घेऊन १७ जुलै रोजी स्थगितीचा निर्णय दिला़ त्यामध्ये २ आॅगस्टपर्यंत स्थगिती दिली़ या निर्णयामुळे तूर्त तरी दुकानदारांना दिलासा मिळाला आहे़ दुधनी नगरपालिका हद्दीतील रेशन दुकानदारांनी अपिलात नाही गेल्याने ते रद्द ठरविण्यात आले आहे़

---------------------------पाठिंब्यासाठी जनमत चाचणीरेशन दुकानदारांमार्फत अ‍ॅड़ धायतडक यांनी युक्तिवाद केला़ २ आॅगस्ट रोजी मूळ कागदपत्रांच्या अहवालावरून सुनावणी होणार आहे़ त्याही दिवशी वकिलामार्फत म्हणणे सादर करावे लागणार आहे़ त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित सर्व गावांमध्ये दवंडी देऊन दुकानदारांविषयी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे़ जनमत चाचणीचा अहवाल १६ जुलैपासून स्वीकारण्यात येत आहे. आतापर्यंत २५ नागरिकांचे अर्ज आले आहेत़ ---------------------------रेशन दुकानदार रद्दप्रकरणी स्थगिती आदेशाची प्रत पुणे कार्यालयाकडून मिळाली नाही़ मात्र दुकानदारांकडून मिळाली आहे़ त्यावरून मार्गदर्शनासाठी मंगळवारी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे़ त्या पत्राचे उत्तर आल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे़- रमेश चव्हाण,जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर