शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

निरादेवघर धरणात ३५ टक्के पाणी ; गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के साठा कमी

By दिपक दुपारगुडे | Updated: March 30, 2024 18:24 IST

वीर धरणातून निरा डाव्या कालव्यात ८२७ क्युसेकने तर निरा उजव्या कालव्यातून १,५५० क्युसेकने पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडण्यात येत आहे.

दीपक दुपारगुडे 

सोलापूर : ब्रिटिशकालीन भाटघर धरणात ३३ टक्के, तर निरादेवघर धरणात ३५.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. भाटघर धरणातून १९८७ क्युसेकने तर निरादेवघर धरणातून ७५० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. सध्या दोन्ही धरणांतून २,७४० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

भाटघर धरणाची क्षमता ३४ टीएमसी तसेच निरादेवघर धरणाची क्षमता ११.९१ टीएमसी पाणीसाठा याप्रमाणे आहे. ही दोन्ही धरणे गतवर्षी १०० टक्के भरली होती. मागील वर्षी या कालावधीत भाटघरमध्ये ४२ टक्के तर निरादेवघर धरणात ५५.३५ टक्के पाणीसाठा होता. त्यानुसार यावेळी भाटघर धरणात १० टक्के तर निरादेवघर धराणात १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. वीर धरणात सध्या ४५.४० टक्के तर गुंजवणी धरणात ४४.२३ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी याच कालावधीत वीर धरणात ६३.८८ टक्के तर गुंजवणी धरणात ६०.२७ टक्के पाणीसाठा होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही धरणांत १८ टक्के पाणीसाठा कमी आहे.पाणीटंचाईची शक्यता...

वीर धरणातून निरा डाव्या कालव्यात ८२७ क्युसेकने तर निरा उजव्या कालव्यातून १,५५० क्युसेकने पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडण्यात येत आहे. दोन्ही कालव्यांतून फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या पूर्वेकडील तालुक्यांना पाणी सोडण्यात येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच धरणांत सरासरी २० टक्के पाणीसाठा कमी असून, सध्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो असाच कायम राहिल्यास पुढील अडीच महिन्यांत धरणे रिकामी होऊन पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकेल.