शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

दोन वर्षांत ३२० कोटींचे अनुदान

By admin | Updated: June 25, 2014 01:45 IST

यंदा जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीसी) खूप मोठा निधी त्यांनी महापालिकेला मिळवून दिला, मात्र मनपा पदाधिकाऱ्यांनी या कामांना ‘खो’ घातला आहे़

सोलापूर: महापालिकेला गेल्या दोन वर्षांत केंद्र, राज्य शासन आणि जिल्हास्तर नियोजन समितीकडून तब्बल ३२० कोटींहून अधिक रकमेचे अनुदान मिळाले आहे़ मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मनपाचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच शासन निधी खेचून आणण्यातदेखील बाजी मारली आहे़ यंदा जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीसी) खूप मोठा निधी त्यांनी महापालिकेला मिळवून दिला, मात्र मनपा पदाधिकाऱ्यांनी या कामांना ‘खो’ घातला आहे़ महापालिकेचे स्वत:चे उत्पन्न कधीही २०० कोटींवर गेले नाही, मात्र गुडेवारांनी विविध फंडे राबविले, यामुळे मनपा तिजोरीत ३०६ कोटींचे उत्पन्न ‘मार्च एण्ड’ला जमा झाले़ यामुळे मक्तेदारांची देणी असोत की कर्मचाऱ्यांना वेतनवाढ असो की नगरसेवकांचा भांडवली निधी असो सढळ हाताने सर्वांना निधी मिळाला आणि झटपट कामे मार्गी लागली ही वस्तुस्थिती आहे़ जिल्हा नियोजन समितीमधून त्यांनी ६० कोटींहून अधिक निधी मिळविला़जिल्हास्तर योजनेतून दोन वर्षांत मिळालेला निधी- नगरोत्थान जिल्हास्तर रस्ते- ४ कोटी ४ लाख, पाणीपुरवठा ९४़२९ लाख, होनमुर्गी पाईपलाईन दुरुस्ती ४९ लाख, रस्ते-ड्रेनेज - ५ कोटी, पाणीपुरवठा- २ कोटी, स्मशानभूमी सुधारणे- ५६़२२ लाख, नगररचना अनुदान-३़३९ कोटी, अग्निशमन सुधारणा- ४़६ कोटी, डीपीडीसी आमदार फंड- ५ लाख, खासदार फंड- ९४ लाख, नागरी दलितेतर अनुदान- २३़८४ लाख, अंगणवाडी केंद्र इमारती बांधकाम- ४़५० लाख, टंचाई कामांतर्गत पाणीपुरवठ्यासाठी- १़३७ कोटी, पुरातन वास्तू संवर्धन अनुदान- ४५ लाख, नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा- ३३़१९ लाख, दलित वस्ती सुधारणा- ३़१२ कोटी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे- १़४० कोटी, स्कॅनर खरेदीकरिता अनुदान- ३६़९६ लाख, नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर विविध कामे- २०़५६ कोटी. गेल्या दोन वर्षांत ४४़८३ कोटींचे अनुदान मिळाले असले तरी चालू वर्षात सन २०१४-१५ मध्ये गुडेवार यांनी ६० कोटींहून अधिक निधी डीपीसीमधून मंजूर केला आहे़केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळालेले अनुदान- एलबीटी करापोटी अनुदान - १५ कोटी, मुद्रांक शुल्क (१ टक्का)- २५़४० कोटी, रस्ता अनुदान- ९़३५ कोटी, अल्पसंख्याकबहुल क्षेत्र विकास अनुदान- ३९़८४ लाख, अनुसूचित जाती व नवबौद्ध घरकूल योजना- २५़६९ कोटी, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान ड्रेनेज अनुदान - २६़८४ कोटी, रस्ते अनुदान - ४६़९४ कोटी, यूआयडीएसएसएमटी अनुदान- ३२़३८ कोटी, विशेष अनुदान- १० कोटी, मनपा क्षेत्रात प्राथमिक सोयी पुरविणे विशेष अनुदान- २३ कोटी, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना- १़६८ कोटी, १३ वा वित्त आयोग अनुदान- ४६़६७ कोटी, घर तेथे शौचालय अनुदान- १०़९१ कोटी, अग्निशमन सेवेचे बळकटीकरण- २३़९६ लाख, ऊर्जा संवर्धन प्रकल्प राबविणे- २० लाख ़गेल्या दोन वर्षांत केंद्र आणि राज्य शासनाकडून मनपाला २७४ कोटींचे अनुदान मिळाले आहे़ चालू वर्षात देखील यात दुपटीने वाढ होणार आहे़ २०० बससाठी ११२ कोटींचे अनुदान मिळणार आहे़ जिल्हा नियोजन समितीमधून सन २०११-१२ मध्ये ४़१२ कोटी, सन २०१२-१३ मध्ये ५़५४ कोटी, सन २०१३-१४ मध्ये ३़८२ कोटी अनुदान मिळाले़ चालू वर्षात गुडेवार यांनी डीपीसीतून ६० कोटींहून अधिक निधी मंजूर करुन घेतला आहे़