शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात २़१५ लाख ग्राहकांकडे ३०२९ लाख रूपयांची थकबाकी, वीजबिल थकबाकीदारांविरोधात महावितरणची धडक मोहीम लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:19 IST

या मोहिमेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ११०० अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी जुनी मिल कंपाउंडमधील 'बिजली भवन' येथे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला.

ठळक मुद्देसद्यस्थितीत वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे जिल्ह्यातील २ लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार वीजग्राहकांकडे ३० कोटी २९ लाख रुपयांची थकबाकीवीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरू राहणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : जिल्ह्यातील २ लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार वीजग्राहकांकडील ३० कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी पूर्णपणे वसूल करण्यासाठी महावितरणच्या वतीने पुन्हा एकदा धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.         या मोहिमेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ११०० अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी जुनी मिल कंपाउंडमधील 'बिजली भवन' येथे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.        यावेळी प्रादेशिक संचालक ताकसांडे म्हणाले की, सद्यस्थितीत वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शून्य थकबाकी मोहिमेत गेल्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये तसे चांगले काम झाले. परंतु फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण थकबाकी वसूल करण्याच्या ध्येयानेच काम करणे आवश्यक आहे व थकबाकी असल्यास वीजपुरवठा खंडितच होणार असा संदेश या मोहिमेद्वारे थकबाकीदारांना द्यावा. ही मोहीम  आक्रमकपणे राबविली गेली पाहिजे व थकबाकी पूर्णपणे या फेब्रुवारी महिन्यातच वसूल झाली पाहिजे, असे निर्देशही ताकसांडे यांनी यावेळी दिले. यासोबतच सर्व अधिकारी व जनमित्रांनी वीजबिलांचे अचूक रीडिंग घेऊन ग्राहकांना वीजवापराचे योग्य बिल मिळेल यासाठी उपाययोजना कराव्यात. यात हयगय करणाºया रीडिंग एजन्सीजविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी मनोगतामध्ये सोलापूर वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त करण्याचे आवाहन केले.  थकबाकी वसुली मोहिमेवर निघालेल्या अभियंता, जनमित्रांनी प्रादेशिक संचालक ताकसांडे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत थकबाकी वसुलीचा निर्धार केला.          जिल्ह्यातील २ लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार वीजग्राहकांकडे ३० कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. आक्रमकपणे सुरू झालेल्या थकबाकी वसुली मोहिमेत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांचे प्रमुख अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो जनमित्र सहभागी झाले आहेत.         वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागणार आहे. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध तात्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.        थकीत वीजबिलांचा संबंधित ग्राहकांनी तात्काळ भरणा करावा अन्यथा वीजपुरवठा खंडितच केला जाणार आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्रे तसेच घरबसल्या 'आॅनलाईन' पेमेंटसाठी महावितरणची  वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.----------------------वीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरू राहणारथकबाकी व चालू वीजबिलांचा ग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे दि.१०, ११ व १३ फेब्रुवारी रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. थकीत देयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (दि.१०), रविवारी (दि. ११) व मंगळवारी (दि. १३) सार्वजनिक सुटी असली तरी जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण