शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्तसाठी २६५ गावांची निवड

By admin | Updated: March 18, 2017 19:56 IST

सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्तसाठी २६५ गावांची निवड

सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्तसाठी २६५ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियान: अक्कलकोट तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेशसोलापूर :- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षाकरिता जिल्ह्यातील २६५ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या गावांची निवड करण्यात आल्याचे अभियानाचे सदस्य सचिव तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी कळविले आहे. यामध्ये सर्वाधित ५३ गावे अक्कलकोट तालुक्यातील असून सर्वात कमी, सात गावे उत्तर सोलापूर तालुक्यातील आहेत.जलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २८० तर २०१६-१७ मध्ये २६५ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांत जलसंधारणाची विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. निवडलेल्या गावांत कामांसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार २३ मार्च २०१७ पर्यंत शिवार भेट, पाण्याचा ताळेबंद तयार करणे, गाव कृती आराखडा तयार करणे, जिल्हा समितीची मान्यता घेणे आदी कामे करणे अपेक्षित आहे. ३१ मार्च पर्यंत कामांचे सर्व्हेंक्षण करणे, अंदाजपत्रक तयार करणे आदी कामे पूर्ण करायची आहेत.५ एप्रिल पर्यंत कामांचे कायार्देश निर्गमित करणे अपेक्षित आहे. शिवार भेटी दरम्यान आणि गावपातळी वरील आराखडा तयार करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतीशिल शेतकरी उपस्थित राहतील. याची संबंधित अधिका-यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बिराजदार यांनी सर्व संबंधित अधिका-यांना केले आहे.

 

----------------------------------------------------निवडण्यात आलेली तालुकानिहाय गावे पुढीलप्रमाणे : - उत्तर सोलापूर (७ गावे) - खेड, शिवणी, ति-हे, बाणेगांव, हगलूर, साखरेवाडी, बेलाटी,-दक्षिण सोलापूर (२६ गावे) - राजूर, सिंदखेड, वडकबाळ, औराद, वरळेगांव, उळेवाडी, बक्षिहिप्परगे, पिंजारवाडी, दर्गनहळ्ळी,, दोडृडी, शिर्पनहळ्ळी, गंगेवाडी,, औज, आ. हिपळे, रामपूर, कर्देहळृळी, लिंबिचिंचोळी,तिल्लेहाळ, शिरवळ, शिगंडवाडी, आलेगांव, कंदलगांव, गावडेवाडी, वोंगी, वडजी, फताडेवाडी, गुर्देहळ्ळी, तोगराळी, होटगी (स्टे), बसवनगर, मनगोळी, अकोले म. चंद्रहाळ, बरुर, बंदलगी, बोलकवठा.-अक्कलकोट (५३ गावे)- जेऊर, घुंगरेगांव, पितापुर, करजगी, कडबगांव, ब्यागीहळ्ळी, चपळगांववाडी, दर्शनाळ, किणीवाडी, किणी, जेऊरवाडी, सुलेर जवळगे, तोळणुर, दुधनी, कोळीबेट, ममदाबाद, काळेगांव, आंदेवाडी, ज. बादोले खु. हैद्रा, हंजगी, मैंदर्गी, साफळे, शिरवळ, हिंगणी, हत्तीकणबस, अरळी, शावळ, बोरेगांव, आकतनाळ, मिरजगी, वागदरी, सांगवी खु., रामपुर, काझीकणबस, नागणसुर, कोन्हाळी, सदलापुर, भुरीकवठा, पालापूर, निमगांव, उमरगे, करनुर, जैनापुर, नाविंदगी, गौडगांव खु, मुंढेवाडी, कलहिप्परगे, शिरवळवाडी, गौडगांव बु., बोरगांव, खैराट, गोगांव, -मोहोळ (२७)- वाळूज, करणवाडी (आ), वाफळे, शेटफळ,सिध्देवाडी, तांबोळे, न. पिंपरी, कोन्हेरी, मोरवंची, चिंचाली, म. चौधरी , बोपले, सोहाळे, वाघोली, कामती खु, कामती बु. जामगांव बु, जामगांव खु, पीरटाकळी, हराळवाडी, वडवळ, शिरापुर (सो), वाघोलीवाडी, बैरागवाडी, कातेवाडी, घोरपडी, लमाणतांडा, - माढा (२१)-बारलोणी, कुडुवार्डी, अंबाड, रिधोरे, तांदुळवाडी, आलेगांव खु, रुई, टाकळी टे., आलेगांव बु, निमगांव टे, बादलेवाडी, उपळवटे, चांदज, दहिवली, कन्हेरगांव, वडोली, उंदरगांव, बुद्रुकवाडी, सुलतानपुर, शिंदेवाडी, जाखले -करमाळा (२४ गावे)- भोसे, रोशेवाडी, देवीचा माळ, भिलारवाडी,वरकटणे, सरपडोह, कुंभेज, निंभोरी, झरे, देवळाली,खडकेवाडी, मिरगव्हाण, निलज, पांगरे, दिवेगव्हाण, गोरेवाडी, हुलगेवाडी, शेटफळ, भगतवाडी, शेलगांव (क), कावळवाडी, कोळगांव, गौंडरे, भाळवणी,- बार्शी (४२ गावे)- बोरगांव झा, रऊळगांव, गाताचीवाडी, नागोबाचीवाडी,लक्ष्याचीवाडी, कसळंब, ढेंबरेवाडी,मालेगांव,ज्योतीबाचीवाडी,उपळे दु, सासुरे, रुई, मिर्झनपुर, संगमनेर, शेळगांव आर, मानेगांव, रातंजन, मुंगशी वा, इलेवार्डी, जवळगांव, काळेगांव, तुर्कपिंपरी, खडकोणी, चुंब, काटेगांव, कोरेगांव, शेळगांव मा, तांबेवाडी, कापसी, जामगांव आ, राळेरास, धामनगांव दु,कासारवाडी, उंबरगे, श्रीपतपिंपरी, शेंद्री, वांगरवाडी, बार्शी, वैराग, झरेगांव, निंबळक, सजार्पूर, -पंढरपूर (१५गावे)-पळशी, सुपली, वाडी करोली, शेळवे, उपरी, लेणार वाडी, कासेगांव, एकलासपूर, ओझेवाडी, नेपतगांव, शिरगांव, नारायण चिंचोली, मगरवाडी, गुरसाळे, टाकळी, -सांगोला (१२गावे)- सोमेवाडी, बंडगरवाडी ( चोपडी), गायगव्हाण, खिलारवाडी, उदनवाडी, हाबिसेवाडी, शिरभावी, मेधवडे, बामणी, संगेवाडी, देवळे, गोडसेवाडी, - मंगळवेढा (१० गावे)- बोराळे, मुंढेवाडी, डोणज, भालेवाडी, फटेवाडी, मंगळवेढा, मुढवी, उचेढाण, बठाण, माचणूर, - माळशिरस (१८ गावे) - मोटेवाडी(मा),सदाशिवनगर,वेळापूर, पिलीव, कोळेगांव, नातेपुते, चौदेश्वरवाडी, गिरझणी, बागेवाडी,दहिगांव, कोंडबावी, काळमवाडी, निमगांव, खंडाळी, माळखांबी, माळशिरस, कन्हेर, फोंडशिरस.--------------------------असे आहे नियोजनजलयुक्त शिवार अभियानासाठी निवडलेल्या गावामध्ेय २३ मार्च २०१७ पर्यंत शिवार भेट, पाण्याचा ताळेबंद तयार करणे, गाव कृती आराखडा तयार करणे, जिल्हा समितीची मान्यता घेणे आदी कामे करणे अपेक्षित आहे. ३१ मार्च पर्यंत कामांचे सर्व्हेंक्षण करणे, अंदाजपत्रक तयार करणे आदी कामे पूर्ण करायची आहेत.५ एप्रिल पर्यंत कामांचे कायार्देश निर्गमित करणे अपेक्षित आहे. शिवार भेटी दरम्यान आणि गावपातळी वरील आराखडा तयार करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतीशिल शेतकरी उपस्थित राहतील असे नियोजन जिल्हा कृषी विभागाने केले आहे़