शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजाराची नवीन मतदार नोंदणी; संजय गांधी निराधार योजनेतही नवीन लाभार्थी

By संताजी शिंदे | Updated: August 13, 2023 18:28 IST

महसूल विभागाच्या वतीने ११ तालुक्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात महसुल सप्ताहात वेगवेगळे उपक्रम राबवले. 

सोलापूर : शासनाच्या आदेशावरून राबिण्यात आलेल्या महसूल सप्ताहामध्ये ५४ हजार १२५ जणांनी लाभ घेतला आहे. यामध्ये अडीच हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली असून संजय गांधी निराधार योजनेतही नवीन लाभार्थी झाले आहेत. महसूल विभागाच्या वतीने ११ तालुक्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात महसुल सप्ताहात वेगवेगळे उपक्रम राबवले. 

नागरिकांची त्यामुळे विविध कामे मार्गी लागली. या अंतर्गत जिल्ह्यात ५४ हजार १२५ जणांना या सप्ताहाचा लाभ झाला. उपक्रमास नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात लाभला. वाढता प्रतिसाद लक्षात घेता ही मोहिम ३० ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. सात बारा दुरुस्तीची २४२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. शासकीय योजनेचा फायदा घेण्यासाठी तालुकास्तरावर ९ हजार ८३५ नागरिकांची उपस्थित होती. त्यापैकी ७९७ लाभार्थी होते. त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सात बारा उताऱ्यावरील नावात दुरुस्तीचे १५५ प्रकरण हाेते. त्यापैकी २४२ प्रकरणांचे दुरूस्ती आदेश देण्यात आले.        युवा संवाद उपक्रमाच्या अंतर्गत ७४९७ प्रमाणपत्र वाटप विविध तालुक्यात करण्यात आले. ३२० महाविद्यालयात जिल्हा प्रशासन पोहचले आहे. यामध्ये १४ हजार ६५० जणांची उपस्थित होती. यापैकी ४३३७ जणांना लाभ मिळाला. नवीन मतदार नोंदणी अंतर्गत २ हजार ७६८ जणांनी नोंदणी केली असल्याचे तहसिलदार दत्ता मोहोळे यांनी दिली.

११ हजार ८५८ जणांना 'एक हात मदतीचा'‘एक हात मदतीचा’ या मोहिम अंतर्गत ११ हजार ८५८ जणांना लाभ मिळाला. शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी योजनांमध्ये नवे लाभार्थी समाविष्ठ झाले. जनसंवाद अंतर्गत जमीनीच्या नोंदी ९९७ जणांचे प्रकरण निकाली काढले. माजी सैनिकांच्या ३२७ अर्जांची निर्गती करण्यात आली. ५२७ महसूल कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करण्यात आले. ४२२ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अशी माहिती महसूल विभागाचे तहसिलदार मोहोळे यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूर