शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सोलापूर जिल्हा परिषदेतंर्गत २५ कोटींची कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 12:10 IST

कर्जमाफीच्या निर्णयामुळे शासकीय तिजोरीला मोठी झळ बसेल, असा सरकारचा अंदाज होता.

ठळक मुद्देरस्ते दुरुस्तीसाठी ३ कोटी ५२ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी २ कोटी ७० लाख रुपयांची कामे मंजूरबहुतांश कामांना मंजुरी देताना महत्त्वाचे काम हाच निकष

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्ते विकास, रस्ते दुरुस्ती, तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि जनसुविधेच्या कामांसाठी गेल्या तीन महिन्यांत सुमारे २५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यातील जवळपास सर्वच कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत. या काम वाटपात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांनी आपल्या ‘राजकीय नियोजनाला’ प्राधान्य दिले आहे.

कर्जमाफीच्या निर्णयामुळे शासकीय तिजोरीला मोठी झळ बसेल, असा सरकारचा अंदाज होता. सावधगिरीचे पाऊल म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये ३० टक्के कपात करण्यात आली. कर्जमाफीचे निकष फारच कडक राहिले. त्याने शासनाच्या तिजोरीला फारशी झळ बसली नाही. त्यामुळे शासनाने ३० टक्के कपातीचा निर्णय मागे घेतला.

जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा मंजूर केलेला होता. त्यानुसार काही कामांना मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी रस्ते विकास, रस्ते दुरुस्ती, जनसुविधा, तीर्थक्षेत्र विकास आदी कामांसाठी नियोजन केले. त्यानुसार तीन महिन्यांत २५ कोटींहून अधिक रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही कामे आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी सुचविलेली आहेत. 

शिंदे आणि डोंगरेंनी खेचली कामे४झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांनी जिल्हा परिषदेचा ३० टक्के सेस निधी करमाळ्यात खर्ची घातला आहे. नियोजन समितीमध्येही त्यांनी करमाळ्याला झुकते माप ठेवले आहे. रस्ते विकासासाठी करमाळा तालुक्यात २ कोटी ३० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. याखालोखाल माळशिरस तालुक्यात १ कोटी ८४ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्येही माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सर्वाधिक कामांचा समावेश आहे. माळशिरसनंतर माढा तालुक्यात सर्वाधिक कामे मंजूर करण्यात आली आहेत. बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी आपल्या मोहोळ तालुक्यात रस्ते, जनसुविधा, तीर्थक्षेत्रासाठी बरीच कामे मंजूर केली आहेत. करमाळ्याला दिले

२ कोटी ३० लाख- रस्ते विकासासाठी ११ कोटी ८४ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. नव्याने वाटप झालेला तालुकानिहाय निधी : बांधकाम विभाग क्र. १ : अक्कलकोट ८२ लाख, बार्शी ७६ लाख, मोहोळ ९० लाख, दक्षिण सोलापूर ४० लाख, उत्तर सोलापूर ४९ लाख, माढा १ कोटी ५८ लाख. बांधकाम विभाग क्र. २ : करमाळा २ कोटी ३० लाख, पंढरपूर ९२ लाख, मंगळवेढा ६७ लाख, माळशिरस १ कोटी ८४ लाख, सांगोला १ कोटी १६ लाख. रस्ते विकासाबरोबरच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने शासनाच्या ३०५४ योजनेतून रस्ते दुरुस्तीसाठी ३ कोटी ५२ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. मोºया दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जनसुविधेसाठी २ कोटी २० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. तीर्थक्षेत्र विकासासाठी २ कोटी ७० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातील बहुतांश कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. बहुतांश कामांना मंजुरी देताना महत्त्वाचे काम हाच निकष ठेवला आहे. - विजयराज डोंगरे, सभापती, अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद