शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

२४ जि. प. सदस्यांपैकी सात जणांचा राजकारणाला ‘रामराम’

By admin | Updated: January 24, 2017 19:56 IST

२४ जि. प. सदस्यांपैकी सात जणांचा राजकारणाला ‘रामराम’

२४ जि. प. सदस्यांपैकी सात जणांचा राजकारणाला ‘रामराम’शिवानंद फुलारी - अक्कलकोटवीस वर्षांच्या कालावधीत अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य म्हणून कारभार पाहिलेल्या २४ सदस्यांपैकी सात जणांनी राजकारणाला कायमस्वरूपी सोडचिठ्ठी देत रामराम ठोकला आहे. त्यातील एक जण आमदार, दुसरे एक जण उपाध्यक्षपद भोगले. तिघांना विरोधी पक्षनेत्याची संधी मिळाली असून, एका सदस्याने पक्षनेतेपदाची धुरा सांभाळली आहे. यात काँग्रेस अव्वल स्थानी राहिली असून, भाजप दुसऱ्या तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी राहिली आहे.तालुक्यात १९६७ पासून आजपर्यंत चपळगाव, वागदरी, सलगर, नागणसूर, मंगरूळ, जेऊर असे सहा गट आहेत. सुरुवातीपासून यात काहीच बदल झाला नाही. अपवाद वगळता मंगरूळ, चपळगाव, वागदरी या गटांमध्ये भाजपचा तर सलगर, नागणसूर गटात काँग्रेस तर जेऊर गटावर राष्ट्रवादीची पकड राहिली आहे. भाजपचे बलभीम शिंदे दहिटणे, महादेवी होरगीनमठ तोळणूर, राजकुमार पाटील, कै. पंचप्पा कल्याणशेट्टी, काँग्रेसच्या भाग्यश्री चव्हाण, गुरूबाई बिराजदार, श्रीशैल वरनाळे वागदरी, सोनाबाई शिंगे सलगर, सरूबाई डोंगरीतोट या सात माजी सदस्यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. सन १९९७ मध्ये स्व. बाबासाहेब तानवडे आमदार होते. तेव्हा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या वागदरी गटात त्यांचे बंधू दत्तात्रय तानवडे यांना काँग्रेसचे श्रीशैल वरनाळे यांच्याकडून अल्पमताने पराभूत व्हावे लागले. २००२ ते २००७ या कालावधीत चपळगाव गटामध्ये भाजपचे स्व. पंचप्पा कल्याणशेट्टी व काँग्रेसचे कै. काशिनाथ भरमशेट्टी यांच्यात चुरशीने लढत झाली. मतमोजणीत घोळ झाल्याने प्रथम भरमशेट्टींना विजयी घोषित करण्यात आले. काँग्रेसची शहरातून मिरवणूक निघाली. दरम्यान, फेरमतमोजणीत ५० मतांनी कै. पंचप्पा कल्याणशेट्टी विजयी झाले. सन २००७ मध्ये भाजपचे शिवानंद पाटील व राष्ट्रवादीचे मल्लिकार्जुन पाटील यांच्यात जेऊर गटातून लढत झाली. या लक्षवेधी लढतीत राष्ट्रवादीचे मल्लिकार्जुन पाटील हे विजयी झाले. वीस वर्षांत झालेल्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेसचे १३, भाजप १०, राष्ट्रवादी १ असे सदस्य राहिले आहेत.

-------------------------------------------हे झाले आमदार अन् सभापतीसन २००७ मध्ये वागदरी गटातून निवडून आलेले भाजपचे सदस्य आनंद तानवडे, सन २०१२ मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे सदस्य महिबूब मुल्ला, सलगर गटातील शिवानंद बिराजदार या तिघांना जि. प. मध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम करता आले. राष्ट्रवादीचे एकमेव सदस्य मल्लिकार्जुन पाटील (जेऊर गट) यांना पक्षनेता होण्याचे भाग्य लाभले. सन १९९७ या कालावधीत जि. प. सदस्य म्हणून निवडून आलेले सिद्रामप्पा पाटील हे जि. प. चे उपाध्यक्ष झाले. २००९ मध्ये भाजपमधून ते तालुक्याचे आमदारही झाले.

---------------------------------------चार पंचवार्षिकमधील सदस्य४सन १९९७: सिद्रामप्पा पाटील (भाजप), भारत जाधव (काँग्रेस), बलभीम शिंदे (भाजप), श्रीशैल वरनाळे (काँग्रेस), सोनाबाई शिंगे (काँग्रेस), सरूबाई डोंगरीतोट (काँग्रेस).४सन २००२: गुरसिद्धप्पा प्रचंडे (भाजप), राजकुमार पाटील (भाजप), पांडुरंग राठोड (काँग्रेस), कै. पंचप्पा कल्याणशेट्टी (भाजप), विजयकुमार ढोपरे (भाजप), आशा इंगळे (काँग्रेस).४सन २००७: भाग्यश्री चव्हाण (काँग्रेस), आनंद तानवडे (भाजप), मल्लिकार्जुन पाटील (राष्ट्रवादी), काशिनाथ कोडते (भाजप), महादेवी होरगीनमठ (भाजप), गुरूबाई बिराजदार (काँग्रेस).४सन २०१२: सिंधुबाई सोनकवडे (काँग्रेस), जयश्री गायगवळी (काँग्रेस), चन्नव्वा अरवत (काँग्रेस), महिबुब मुल्ला (काँग्रेस), शिवानंद बिराजदार (काँग्रेस), अभिजित ढोबळे (भाजप-राष्ट्रवादी आघाडी).