शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत २१ हजार शेतकरी मतदानापासून वंचित राहणार, सामायिक खात्यावरील एकाची नोंद घेण्याच्या निर्णयाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:39 IST

एकाच शेतजमिनीच्या उताºयावर एकापेक्षा अधिक नावे असतील तर फक्त पहिल्या क्रमांकावर असलेल्या शेतकºयाला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सहकार आणि पणन विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा फटका उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ हजारांहून अधिक शेतकºयांना बसला आहे

ठळक मुद्देराज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाउच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी युद्ध पातळीवर सुरू मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू असताना एकाच उताºयावर एकापेक्षा अधिक शेतकºयांची नावे असल्याचे निदर्शनास आले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : एकाच शेतजमिनीच्या उताºयावर एकापेक्षा अधिक नावे असतील तर फक्त पहिल्या क्रमांकावर असलेल्या शेतकºयाला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सहकार आणि पणन विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा फटका उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ हजारांहून अधिक शेतकºयांना बसला आहे. या शेतकºयांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू असताना एकाच उताºयावर एकापेक्षा अधिक शेतकºयांची नावे असल्याचे निदर्शनास आले. याबाबत जिल्हा निवडणूक कार्यालयाने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले होते. सहकार, पणन विभागाने सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सामायिक खात्यावरील पहिल्या क्रमांकावर असलेल्या शेतकºयाला मतदानाचा अधिकार देण्याचे आदेश दिले. सोलापूर बाजार समितीचे गण निश्चित करताना निवडणूक कार्यालयाने १ लाख २ हजार ९५९ मतदार निश्चित केले होते. यासाठी उताºयावरील सर्व शेतकºयांच्या नावाची नोंद घेतली होती. परंतु, नवे आदेश आल्यानंतर फक्त पहिल्या शेतकºयाचे नाव मतदार यादीत आले आणि इतरांची वगळण्यात आली.---------------------दोन तालुक्यातून वंचित मतदार उत्तर तहसीलदारांनी पूर्वी ८ अ उताºयावरील नोंदीनुसार ५४ गावातील ३९ हजार ८७१ मतदारांची नावे सादर केली होती. परंतु, सामायिक खात्यातील पहिल्या खातेदाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय आल्यामुळे तहसीलदारांनी नव्याने यादी केली. यात ११ हजार ८७० मतदारांची नावे वगळण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६३ हजार ०८८ मतदारांची नावे सादर करण्यात आली होती. नव्या निर्णयामुळे ५३ हजार २१४ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातूनही १० ते १५ हजार नावे वगळण्यात येण्याची शक्यता आहे. -------------------------मुदतीत होणार नाहीत निवडणुका...- उच्च न्यायालयात बार्शी बाजार समितीची निवडणूक ११ मार्च २०१८ पर्यंत तर सोलापूर बाजार समितीची निवडणूक १४ एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून बाजार समिती प्रशासनाला मतदार याद्या पाठविल्या जातील. यानंतर बाजार समिती प्रारूप मतदार यादी तयार करून निवडणूक कार्यालयाला पाठविणार आहे. या मतदार यादीवर हरकती घेतल्या जातील. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती