शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

२० लाखाचे सोने-चांदी जप्त : दोन महिलांसह चौघेअटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 23:02 IST

आॅटो रिक्षा, बसमध्ये सहप्रवाशाप्रमाणे शेजारी बसून प्रवाशाचे दागिने लांबविणाºया चार जणांना परिमंडळ पथकाने अटक केली. चोरट्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ७९.५ तोळे सोने व २३ तोळे चांदी असा एकूण १९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी आज ही माहिती दिली.

सोलापूर, दि. 4 - आॅटो रिक्षा, बसमध्ये सहप्रवाशाप्रमाणे शेजारी बसून प्रवाशाचे दागिने लांबविणाºया चार जणांना परिमंडळ पथकाने अटक केली. चोरट्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ७९.५ तोळे सोने व २३ तोळे चांदी असा एकूण १९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी आज ही माहिती दिली.अनिता बलभीम गायकवाड, रेखा लक्ष्मण गायकवाड, गणेश विलास जाधव, संजय उर्फ कालू मनोहर जाधव, अर्चना संजय जाधव, महादेवी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. गीता सोमनाथ बळे (रा. संगम बंग, मुळेगाव रोड) या रिक्षामधून प्रवासा करत असताना तीन अनोळखी महिलांनी त्यांची बॅग चोरून नेली होती. त्या बॅगेत ३६ हजार २२० रुपयांचे दागिने होते. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात ७ जून २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी अनिता व रेखा या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा करताना आणखी तिघांचा समावेश असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.  पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील विविध ठिकाणांहून बसमधून प्रवास करताना लक्ष विचलित करून पर्स चोरणे, रिक्षामधून प्रवासी महिलेचे मंगळसूत्र, बोरमाळ, सोन्याची चेन चोरत असल्याची कबुली आरोपी गणेश जाधव याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्या घरातून सोन्याचे दागिने जप्त केले. पोलिसांनी आरोपीकडून ७९.५ तोळे सोने व २३ तोळे चांदी असा एकुण १९ लाख ७१ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीकडून पंधरा गुन्हे उघडकीसआरोपीकडून पाच पोलीस ठाण्यातील पंधरा गुन्हे उघडकीस आले आहेत. यात जोडभावी पेठ पोलीस ठाणे चार, सदर बझार पोलीस ठाणे दोन, विजापूर नाका पोलीस ठाणे एक, फौजदार चावडी पोलीस ठाणे सात गुन्हे, जेलरोड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण पंधरा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.यांनी केली कामगिरीपोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) अपर्णा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोसइं नागेश मात्रे, पोकॉ. प्रकाश गायकवाड, सदर बझार पोलीस ठाण्याचे पोकॉ. विकी गायकवाड, जेलरोड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार जमादार, फौजदा चावडी पोलीस ठाण्याचे मुदगल, बाबर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोकॉ. भारत गायकवाड आदींनी ही कामगिरी केली.५० जणांना तडीपार करणार सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील ५० गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. जुगार व मटका चालविणाºयांविरुद्ध तडीपारीची कारवाई सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. पोलीस उपआयुक्त परिमंडळ अपर्णा गीते यांच्या पथकाने ८० तोळे सोने व २३ तोळे चांदी जप्त करून चार आरोपींना जेरबंद केले. त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.