महापालिका क्षेत्रात ८५५ चाचण्यांमधून ३१ रुग्ण आढळून आले. २८ जणांनी कोरोनावर मात केली. अद्यापही ११६ जण होम क्वारंटाईन आहेत तर ५८ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत. ४२ जण घरात राहूनच उपचार घेत आहेत. मरण पावलेली व्यक्ती गवळी वस्ती तालीम भागातील ६९ वर्षीय पुरुष आहे.
ग्रामीण भागात २२९२ चाचण्यांमधून १४९ रुग्ण आढळून आले. १४५ जणांनी कोरोनावर मात केली. मृतांमध्ये पुळूजवाडी, ता. पंढरपूर येथील ६० वर्षीय पुरुष, मांगी, ता. करमाळा येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये अद्यापही १२ हजार १२ जण होम क्वारंटाईन आहेत. ३०९७ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत.
---
शहरातील मृतांची एकूण संख्या झाली ५६४
ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ८८९ झाली आहे. यापैकी ३२ हजार २०८ जणांनी कोरोनावर मात केली. अद्यापही १६३४ जण रुग्णालयात आहेत. मृतांची एकूण संख्या १०४७ झाली आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १० हजार ४७३ झाली आहे. यापैकी ९ हजार ४८७ जणांनी कोरोनावर मात केली. अद्यापही ४२२ जण रुग्णालयात आहेत. मृतांची एकूण संख्या ५६४ झाली आहे.