शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

आधी चाकूने वार, मग केबल वायरने १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण; रुग्णालयात उपचार

By विलास जळकोटकर | Updated: September 13, 2023 16:21 IST

पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सहा जणांचा हल्ला

विलास जळकोटकर, सोलापूर : पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सहाजणांनी मिळून एका १७ वर्षाच्या मुलीला चक्क चाकूने वार करुन केबलच्या वायरनं बेदम मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली.  पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. संध्याराणी शिवाजी केदार (वय १७) असे या जखमी मुलीचे नाव आहे.

यातील जखमी मुलीशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी भंडीशेगाव येथील कुबेर हरिबा कदम, सुधीर कुबेर कदम यांच्यासह सहाजणांनी मिळून चाकूने वार करुन जखमी केले. केबल वायरच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. यात जखमी संध्याराणी हिच्या कपाळाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात तिला त्रास होऊ लागल्याने जवळच असलेल्या पंढरपुरातील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी सोलापूरला नेण्याचा सल्ला दिला. तिला मामा तानाजी काळे यांनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर