आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक असल्याचा अहवाल आला आहे. त्यापैकी ८१ इमारती नव्याने बांधण्यासाठी पंचायत समितीमार्फत गटशिक्षणाधिकाºयांकडून प्रस्ताव आले आहेत.जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक बैठक शुक्रवारी पार पडली. त्यात या विषयावर चर्चा झाली. बैठकीला शिक्षण सभापती शिवानंद पाटील, सदस्य मायाक्का यमगर, गोविंद जरे, संजय गायकवाड, रणजितसिंह शिंदे, स्वाती कांबळे उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळांच्या धोकादायक असलेल्या इमारती निर्लेखित करून पाडण्यासाठी दरवर्षी आढावा घेतला जातो. अशा १६४ इमारतींची माहिती यावर्षी पुढे आली आहे. या सर्व शाळांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकाºयांकडून तत्काळ पाठविण्यात यावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.येत्या आॅगस्ट महिन्यामध्ये जिल्ह्यात ज्ञानरचनावाद कार्यक्रम राबविण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सहा लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाचाही आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ५५०० रोपे लावण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २८२३० रोपे लावण्यात आली़ ही सर्व रोपे जगविण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी वेबसाईट तयार केली जाणार आहे. राज्यस्तरीय खेळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाºया शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी या वर्षापासून जिल्हा परिषदेकडून पुरस्कार दिले जाणार आहेत़ यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून पाच लाख रूपयांची तरतूद केली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांच्या दैनिक उपस्थितीच्या नोंदीसाठी बायोमेट्रिक मशीनचा वापर केला जावा, यावरही चर्चा करण्यात आली. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अशा मशिन्स उपलब्ध आहेत. त्यावर शिक्षकांनीही नोंदी कराव्यात यादृष्टीने काय तांत्रिक सुधारणा करता येईल, या संदर्भात माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे ठरले आहे.------------------------------कमी पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांचे समायोजनच्जिल्ह्यात १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३४ आणि २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १८९ शाळा आहेत. या सर्व शाळा एकशिक्षकी असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती नसली तरी शिक्षकांना शाळेत हजर राहावे लागते. त्यामुळे गरजेनुसार या शाळा बंद करून येथील शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याच्या दृष्टीने येत्या सात दिवसांत माहिती सादर करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. सांगोला, करमाळा, माळशिरस, अक्कलकोट या तालुक्यात अशा शाळांची संख्या अधिक आहे.
सोलापूर जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक
By appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 12:20 IST
सोलापूर दि २९ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक असल्याचा अहवाल आला आहे. त्यापैकी ८१ इमारती नव्याने बांधण्यासाठी पंचायत समितीमार्फत गटशिक्षणाधिकाºयांकडून प्रस्ताव आले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक
ठळक मुद्देशिक्षण विभागाची माहिती८१ नव्या इमारतीचे प्रस्ताव दाखलकमी पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांचे समायोजन