शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या १५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार १ मे रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By admin | Updated: April 26, 2017 19:54 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : आप्पासाहेब पाटीलमहाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल शहर व ग्रामीण पोलीस दलातील १५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे प्रदान करावे अशा सुचना पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे़ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक दिले जाते़ अशा पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येते़ २०१६ सालानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील १५ पोलीसांना महासंचालकांचे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह मिळणार आहे़ तसेच पोलीस महासंचालकांची सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची दुसऱ्या घटकात बदली झालेली असेल तर अशा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी सुपूर्द करावेत अशाही सुचना महासंचाकांनी दिल्या आहेत़ --------------------------------हे आहेत मानकरीसिताराम राजाराम अनभुले : रा़रा़पो़बल गट १०अर्जुन पांडूरंग कुंटेलु : रा़रा़पो़बल गट १०अशोक भाऊराव हंबर्डे : रा़रा़पो़बल गट १०भानुदास गणपती सुर्यवंशी : रा़रा़पो़बल गट १०मोहन श्रीपती धुमाळ : रा़रा़पो़बल गट १०सायबन्ना व्यंकय्या कोळी : सहा़ पोलीस निरीक्षक, सोलापूर ग्रामीणराजकुमार रामप्रसाद परदेशी : पोलीस हवालदार, सोलापूर शहर पोलीसविजयकुमार दिगंबर पावले : पोहेकॉ, ग्रामीण पोलीस, सोलापूरअल्ताफ नुरमहंमद शेख : सोलापूर शहर पोलीसदिनकर काशीनाथ खराडे : सोलापूर शहर पोलीसअरूण मोहनराव पंचवाघ : सोलापूर शहरसंजय भगवान सर्जे : सोलापूर शहरऔदुंबर गोरख आटुळे : सोलापूर शहरसंतोष भगवान साबळे : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूरकोट़़़़़़़१५ वर्षे विशेष सेवा करून गुन्हेगारी कमी करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चोखपणे हाताळणे, लोकांशी सुसंवाद अशा विविध वैशिष्टयांनी पूर्णपणे असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे पदक दिले जाते़ पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामांची पोचपावती आहे़ महासंचालकांचे सन्मानचिन्हासाठी शहर पोलीस दलातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती वरिष्ठ कार्यालयास पाठवून देण्यात आली होती़ त्यापैकी शहर व ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार आहे़ अर्पणा गितेपोलीस उपायुक्त, सोलापूर शहर पोलीस़