शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावांना मिळाली सदस्यपदाची संधी

By admin | Updated: January 25, 2017 18:13 IST

उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावांना मिळाली सदस्यपदाची संधी

उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावांना मिळाली सदस्यपदाची संधीसोलापूर आॅनलाईन लोकमत - नेतेमंडळींची मर्जी संपादन करण्यासाठी यशस्वी झालेल्यांनाच आजवर उमेदवारी मिळाली असून, उत्तर तालुक्यातील १४ गावांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्याची संधी मिळाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील १० गावे सोलापूर शहरात सामावल्यानंतर अवघी ४० गावे व ३६ ग्रामपंचायती तालुक्यात राहिल्या आहेत. दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती मतदारसंघ असलेल्या तालुक्यावर आजवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. शिवसेना-भाजपाचे केंद्रात व राज्यात सरकार असले तरी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदार काँग्रेसचे उमेदवार विजयी करतात. त्याला कारणही साजेसे आहे. सेना-भाजपाचे नेते पाच वर्षे नागरिकांच्या संपर्कात नसतात व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युतीचा निर्णय अगदी शेवटच्या काही मिनिटाला होतो. काही ठिकाणी युतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता असते परंतु प्रचारात असलेलेच घोळ घालतात. असा आजवरचा अनुभव असल्याने काँग्रेस-राकाँने दिलेले त्याच-त्या गावचे उमेदवार विजयी झालेले आहेत. नान्नजच्या नागनाथ विभुते, सीताबाई अनिल गवळी, सुनंदा लक्ष्मण कोरे, यशोदा घोडके, प्रवीण भालशंकर, तिऱ्हेचे हरिभाऊ जाधव, दिलीप माने, भीमराव आदटराव, कवठ्याचे रुक्मिणी केंगार, महादेव पाटील, डोणगावच्या प्रमिला गायकवाड, शारदा आवताडे, बेलाटीचे जगन्नाथ पाटील, विजया पाटील, पाकणीचे सुभाष शिंदे, कोंडीचे घनशाम भोसले, गुळवंचीचे संभाजी इंगळे, विठ्ठल बोराडे, अकोलेकाटीचे शिवाजी क्षीरसागर, शंकर क्षीरसागर, रंजना धनंजय लामकाने, कौठाळीचे हणमंत निचळ, रामभाऊ माने, शामराव माने, उद्धव साबळे, वडाळ्याचे बळीराम साठे, पांडुरंग पवार, बाणेगावचे बाबुराव ढोणे, भारती ढोणे व ब पांडुरंग चवरे, मार्डीचे किसनराव पाटील, बाळासाहेब किसनराव पाटील, इंद्रजित पवार, ज्योती अविनाश मार्तंडे व सुरेखा बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे.----------------------------पक्षाने दिले; मात्र गावाने हुकवलेबीबीदारफळ जिल्हा परिषद गटातील सर्वाधिक लोकसंख्या बीबीदारफळ गावाची आहे. या गावच्या शिवाजी ननवरे यांना शिवसेनेने जि.प. ची उमेदवारी दिली होती. पक्षातीलच काहींनी व गावातील काहींनी विरोध केल्याने ननवरे पराभूत झाले होते. विलास साठे यांना पं.स.ची उमेदवारी दिल्यानंतरही साठे यांच्या गाडीत फिरणाऱ्यांनीच विरोधात मतदान केल्याने साठे यांचा पराभव झाला होता. पक्षाने दिले तरी गावातूनच विरोध झाल्याने गावातील सदस्य विजयी झाला नाही.