शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाठविल्या होत्या १२०० शिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 12:22 IST

प्रत्येक गावात केले होते शिलापूजन; रामज्योती कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन

ठळक मुद्दे३० सप्टेंबर १९८९ मध्ये घटस्थापनेच्या दिवशी शिलापूजन करण्यात आलेशिवस्मारक येथे जिल्ह्यातील सर्व शिला एकत्रित करून त्या रथात ठेवल्याराम मंदिराच्या निर्माणासाठी सोलापुरात विविध कार्यक्रम घेण्यात आले होते

सोलापूर : अयोध्या येथे बुधवारी राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे; त्यानंतर बांधकामास सुरुवात होणार आहे; पण मंदिराच्या निर्माणासाठी १९८९ मध्ये जिल्ह्यातून सुमारे १२०० शिला (विटा) पाठविण्यात आल्या होत्या. प्रत्येक गावात शिलापूजन करण्यात आले होते.

राम मंदिराच्या निर्माणासाठी अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. विश्व हिंदू परिषदेकडून शिलापूजनाचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. प्रत्येक गावागावातून शिलापूजन करण्यात आले होते. शहरातील अनेक मंदिरामध्ये शिलापूजन करण्यात आले होते. ३० सप्टेंबर १९८९ मध्ये घटस्थापनेच्या दिवशी शिलापूजन करण्यात आले. शिवस्मारक येथे जिल्ह्यातील सर्व शिला एकत्रित करून त्या रथात ठेवल्या होत्या. त्याच दिवशी हा रथ अयोध्येकडे रवाना झाला. त्यावेळी शहरातून मिरवणूकही काढण्यात आली होती.

राम मंदिराच्या निर्माणासाठी सोलापुरात विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. याचे यशस्वी आयोजन करण्याचे श्रेय हे त्यावेळच्या कार्यकर्त्यांना जाते. यात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री कै. बंडेश पांढरे, जिल्हा मंत्री अ‍ॅड. चंद्रकांत मोकाशी, प्रभावती सारोळकर, कै. बापूराव सारोळकर, पुरुषोत्तम उडता, भुजंगराव घुगे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष कै. अरुण वैद्य यांचा सहभाग होता.

मान्यवरांच्या सभेने चैतन्यश्रीरामाचे बंधू भरत यांनी नंदिग्राम येथे वनवासाच्या काळात श्रीरामाच्या पादुकांचे पूजन केले होते. त्या पादुकांच्या (खडावा) अनेक प्रतिकृती तयार करून त्या देशभर पाठविण्यात आल्या होत्या. शहरातील प्रत्येक चौकामध्ये या पादुका पूजनाचा कार्यक्रम २६ सप्टेंबर १९९२ मध्ये झाला. यासोबततच साध्वी शिवा सरस्वती, ऋतंबरा देवीजी, आचार्य धर्मेंद्रजी, विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक अशोक सिंघल हे विविध टप्प्यामध्ये सोलापुरात आले होते. शिवस्मारक, पुंजाल मैदान, बसवंती मंगल कार्यालय येथे त्यांच्या सभा झाल्या होत्या. 

मंदिर निर्माणासाठी रामज्योती कार्यक्रम १८ आॅक्टोबर १९९० रोजी घेण्यात आला होता. अयोध्येवरुन आणलेल्या ज्योतीच्या माध्यमातून सोलापूरकरांनी आपल्या घरासमोर दिवा प्रज्वलित केला होता. शहरातील नागरिकांनी शिलापूजन, रामज्योती कार्यक्रम, पादुका पूजन या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.- उदय वैद्य, सोशल मीडिया प्रमुख, महाराष्ट्र प्रांत, विश्व हिंदू परिषद

टॅग्स :SolapurसोलापूरAyodhyaअयोध्या