शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सोलापूरच्या रेल्वे कॉलनीमधील जुगार अड्ड्यावर धाड, १२ जण अटकेत, ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 13:01 IST

रेल्वे स्टेशनजवळील विकास बारच्या जवळील बंद असलेल्या रेल्वे कॉलनीमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सदर बझार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाड टाकून १२ जणांना अटक केली.

ठळक मुद्देया धाडीत आरोपींकडून ५७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाअवैध जुगार अड्ड्यावर सदर बझार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाडमुंबई जुगार अ‍ॅक्ट कलम ४ व ५ अन्वये सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५  : रेल्वे स्टेशनजवळील विकास बारच्या जवळील बंद असलेल्या रेल्वे कॉलनीमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सदर बझार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाड टाकून १२ जणांना अटक केली. या धाडीत आरोपींकडून ५७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बंद रेल्वे क्वॉर्टरमध्ये अंदर बाहर नावाचा जुगार सुरू असल्याची खबर डीबी पथकातील पोलीस नाईक सिद्राम नाईक यास मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक एन. जी. अंकुशकर यांना कळवून त्यांच्या आदेशानुसार डीबी पथकासमवेत मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळ गाठले. विकास बारच्या समोर वाहने पार्क करुन रेल्वे क्वॉर्टर गाठले असता बंद खोलीत आतून आवाज ऐकू आला. दरवाजा ढकलून सर्व आत गेले असता गोलाकार बसून पत्त्याचा जुगार सुरु असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने सर्वांची नाकेबंदी करुन १२ जणांना ताब्यात घेतले. प्रत्येकांनी  जुगारासाठी वापरलेला एकूण ५७ हजार ६० रुपये मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या आरोपींमध्ये मोहमद अतीक शेख (वय ३३, १०६, रेल्वे लाईन्स,सोलापूर), विनायक अनंतराव राक्षे (वय ३०, फुरडे कॉम्प्लेक्स, दमाणीनगर, सोलापूर), मल्लिनाथ भास्कर (वय ५८, उत्तर कसबा), शिवानंद इरण्णा बिराजदार (वय मल्लिकार्जुन नगर,सोलापूर), विनोद रामचंद्र राठोड(वय २९, रा. वडजी), सुमित अमोगसिद्ध शेंडगे (वय २२, रा. लोभाजी मास्तर चाळ), बसवराज लक्ष्मण केमशेट्टी (वय ४३, रा. तडवळ, अक्कलकोट), व्यंकटेश चिट्टर (वय ४३, रा. देगावनाका, लक्ष्मी पेठ), सादिक शब्बीर सय्यद ( नई जिंदगी), जाकीर बाबुलाल शेख (वय ४६, नई जिंदगी, सोलापूर), जावेद रुकमोद्दीन सिद्धकी (वय  २८, रा. पाच्छा पेठ, सोलापूर), सलीम बागवान- मुजावर (साखर पेठ, सोलापूर) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध मुंबई जुगार अ‍ॅक्ट कलम ४ व ५ अन्वये सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस