शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

झुडपात दडवून ठेवलेल्या 11 बाईक, लॅपटॉप आणि मोबाईल केला जप्त

By रवींद्र देशमुख | Updated: April 19, 2023 15:40 IST

या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

रवींद्र देशमुख सोलापूर : चोरी केल्यानंतर झुडपात दडवून ठेवलेल्या ११ बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यासह चोरीतील दोन लॅपटॉप, ५ मोबाईल असा एकूण जवळपास तीन लाखाचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतला . या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

चोरी केलेले दोन लॉपटॉप घेऊन एक आरोपी कर्णिक नगर येथे थांबलेला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सपोनि संजय क्षीरसागर यांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी उमेश नागनाथ भोसले ( वय २५, रा. भगवान नगर झोपडपट्टी) याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने ७ मोटारसायकल व दोन लॅपटॉप आणि ५ मोबाईल चोरल्याचे कबूल केले.

पोलिसांनी त्याच्याकडून वरील एकूण २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सपोनि श्रीनाथ महाडीक यांना मिळालेच्या माहितीवरून प्रशांत यल्लप्पा शिवशरण ( वय २६, रा. रुपाभवानी मंदीराजवळ) याला ताब्यात घेत त्याच्याकडून तीन दुचाकी व मार्केट यार्ड परिसरात एका संशयित इसमाचा पाठलाग करत वैजनाथ शाहू कोळेकर ( वय १९, रा. जय मल्हार नगर बाळे) असे पकडले. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी