सोलापूरात ट्रॅव्हल्स व ट्रकचा अपघात, १० गंभीर जखमीसोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगांवजवळ ट्रक व खासगी बसचा भीषण अपघात झाला़ या अपघातात १० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़ या जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत़सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरहुन पुण्याला जाणारी खासगी बस चा ट्रकचा समोरासमोर अपघात झाला़ या अपघातात व्यंकटेश ईश्वरप्पा रापर्ती (वय २३), अश्विनी सारंग माडचेट्टी (वय २५), राजू भिमय्या आंदोली (वय ३२), सतीश विजय बाबुशिलम (वय २५), विजया पद्यागर्ला (वय ५०), शंकरम्मा किस्त्या रॉय (वय ६०), श्रीनिवास ईश्वराय्या रापर्ती (वय ४६), सरूबाई सिद्राम कलशेट्टी (वय ३०), आनंद दुर्गाय्या रापर्ती (वय ५०) अशी जखमींची नावे आहेत़ सध्या तरी हे सर्वजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे़ यातील जखमी काही हैद्राबाद शहरातील आहेत़ या अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती़ जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यासाठी केगांव ग्रामस्थांनी सहकार्य केले़ या घटनेनंतर काही वेळाने पोलीस दाखल झाले़
सोलापूरात ट्रॅव्हल्स व ट्रकचा अपघात, १० प्रवासी गंभीर जखमी
By admin | Updated: February 10, 2017 17:52 IST