सोलापूर: तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १0 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला चांगलीच रंगत आली असून, इच्छुकांची संख्याही वाढली आहे. आज अर्जांची छाननी होती. तहसीलदार रघुनाथ पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या छाननीत १0 अर्ज नामंजूर झाले. त्यात कुरघोट २, वडगाव-शिरपनहळ्ळी- १, बरुर - १, राजूर- १, तांदुळवाडी- १, नांदणी - ४ अर्जांचा समावेश आहे. तिसरे अपत्य, एकाच प्रभागातून दोन अर्ज आदी कारणाने अर्ज नामंजूर झाले आहेत. छाननीअंती गावानिहाय मंजूर अर्जांची संख्या: हणमगाव २३, होटगी स्टेशन ६६, पिंजारवाडी २३, शिंगडगाव ३७, लिंबीचिंचोळी ९, दिंडूर ३१, कुरघोट २७, वडजी १३, होटगी/सावतखेड ८१, वडगाव/शिरपनहळ्ळी ३0, बरुर ५४, राजूर २७, बोळकवठे/बंदलगी ३८, तांदुळवाडी ४३, मुळेगाव तांडा १६, टाकळी ३८, मद्रे २९, बक्षीहिप्परगे २५, बोरामणी ५५, सादेपूर ३१, हिपळे २१, नांदणी ३५, चिंचपूर १. (प्रतिनिधी) लिंबीचिंचोळी बिनविरोध र८ेु'>च्/र८ेु'>माजी जि. प. सदस्य श्रीशैल नरोळे यांच्या नेतृत्वाखाली लिंबीचिंचोळी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. ९ जागांसाठी तेवढेच अर्ज दाखल झाले आहेत. नरोळे कुटुंबाचे वर्चस्व या निवडणुकीत कायम राहिले असून, विरोधकांनाही सत्तेत सहभाग मिळाला आहे. अनु. जातीचे उमेदवारच नाहीतर वडापूर, निंबर्गी, चिंचपूर आणि वांगी या चार ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. चिंचपूरसाठी ओबीसी प्रवर्गातून एकच अर्ज आला असून, तो मंजूर झाल्याने ही निवडणूक अविरोध झाली तर अन्य तीन पोटनिवडणुकीत अनुसूचित जमातीचे अर्ज नसल्याने तिन्ही जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत. |