शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यात अचानक आले ६ कोटी, तरुणाने सर्व पैसे केले खर्च, आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 16:07 IST

सध्याच युग हे डिजिटल युग. बँक व्यवहारही डिजिटल पद्धतीने करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यात फसवणुकीच्याही अनेक घटना समोर आलेल्या आहेत. ऑनलाईन पैसे पाठवताना चुकून दुसऱ्या खात्यात पैसे गेल्याच्याही अनेक घटना समोर येतात.

सध्याच युग हे डिजिटल युग. बँक  (Bank) व्यवहारही डिजिटल पद्धतीने करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यात फसवणुकीच्याही अनेक घटना समोर आलेल्या आहेत. ऑनलाईन पैसे पाठवताना चुकून दुसऱ्या खात्यात पैसे गेल्याच्याही अनेक घटना समोर येतात, आता अशीच एक घटना समोर आली. एका तरुणाच्या बँक खात्यावर अचानक सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे आले, एवढी मोठी रक्कम खात्यावर आल्याचे पाहून त्याने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यास सुरूवात केली. पण, हे प्रकरण समोर आल्यानंतर या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

एका दाम्पत्याने एक नवे घरे खरेदी केले होते, या घराचा पूर्ण व्यवहारही झाला होता. या घराचे पैसे पाठवण्यासाठी दाम्पत्याने ऑनलाईन ट्रान्झीशन करण्यास सुरुवात केली. पण, त्यांनी टाकलेला खाते नंबर चुकीचा होता, त्यामुळे त्यांनी पाठवलेले पैसे चुकीच्या खात्यावर गेले. म्हणजेच हे सर्व पैसे या तरुणाच्या खात्यावर जमा झाले. ही घटना या दाम्पत्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेत तक्रार केली. 

८३ वर्षांची विदेशी नवरी तर २८ वर्षांचा पाकिस्तानी नवरा...एक अनोखी प्रेमकहाणी!

बँकेत तक्रार करेपर्यंत या तरुणाने बँक खाते रिकामे केले होते. त्यामुळे बँकेतील अधिकाऱ्यांना यावर काहीच करता आले नाही, त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या तरुणाचे नाव अद्बेल घडिया असं आहे. हा तरुण ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे राहतो. त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. 

दाम्पत्याने चुकून त्या तरुणाच्या खात्यात ६ कोटी १४ लाख रुपये पोठवले होते. हे पैसे आल्याचे कळताच त्या तरुणाने कोणतीही चौकशी केली नाही. वेळ वाया न घालवता त्याने सर्व काढले. यातील काही पैशांचे त्याने सोने खरेदी केले. तर ९० हजारांची त्याने शॉपींग केली. त्याने या पैशातून मोठी पार्टीही केली आणि सर्व पैसे उडवले. आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलbankबँकfraudधोकेबाजी