पहावं ते नवलंच, बदकाची हेअरस्टाईल बघुन तुम्हीही म्हणाल,'हँडसम हंक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 15:12 IST
चित्रपटातील नायक नायिकांच्या हेअरस्टाईल फॉलो करायचा तर एकेकाळचा जमाना होता. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की कोणत्याही प्राण्याची हेअरस्टाईल असु शकते.
पहावं ते नवलंच, बदकाची हेअरस्टाईल बघुन तुम्हीही म्हणाल,'हँडसम हंक'
एखादा तरुण रस्त्यावरून चालत असेल आणि त्याची हेअरस्टाईल तुम्हाला आवडली तर तुम्हालाही तशीच हेअरस्टाईल हवीशी वाटू शकते. चित्रपटातील नायक नायिकांच्या हेअरस्टाईल फॉलो करायचा तर एकेकाळचा जमाना होता. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की कोणत्याही प्राण्याची हेअरस्टाईल असु शकते.
पेनसिल्वेनियाच्या होली मीड हिच्याकडे अनेक बदके आहेत पण त्यातील एक बदक अख्ख्या जगाचं लक्ष वेधुन घेतंय. त्याच्या अनोख्या हेअरस्टाईलमुळे ते व्हायरल होतंय. या बदकाच्या डोक्यावर पंखांचा असा काही झुबका आहे की ज्याला पाहिल्यावर तुम्हाला जॉर्ज वॉशिंग्टन, क्वीन एलिझाबेथ, अल्बर्ट आईनस्टाईल अशा व्यक्तिमत्वांची आठवण येऊ शकते.
त्या बदकाच नाव आहे जेर्टर्ड. होलीने बोर पांडाला असे सांगितले की हे तिचे साडेतीन वर्षाचे क्रेस्टेड पेकिंग डक आहे. तिने सांगतिले की जेव्हा हे बदक जन्माला आले तेव्हा त्याच्या डोळ्यावर मोठी गाठ होती. ज्याची आता सुंदर हेअरस्टाईल झाली आहे.
होली म्हणाली सुरुवातीला त्याचा एक फोटो व्हायरल झाला आणि मग या बदकाचे अनेक चाहते झाले. इनस्टाग्रामवर माय पेट डक्स नावाचे पेज आहे ज्यावर तुम्ही या बदकाचे फोटो व्हिडिओ पाहु शकता. याचे १५ हजार फॉलोवर्स आहेत.