सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन महिला एका मुलीसोबत कपड्याच्या दुकानात चतुराईने चोरी करताना दिसत आहेत. दुकानदार आपल्या कामात व्यस्त असताना, हे संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीमागे चोरी करून दुकानदाराची फसवणूक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक दुकानदार त्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना कपडे दाखवत असल्याचं दिसून येतं. या ग्राहकांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. दुकानदार कपडे काढण्यासाठी मागे वळताच एक महिला दुकानात समोर ठेवलेली पँट काढते आणि शेजारी उभ्या असलेल्या महिलेला देते, त्यानंतर ती बाई पँट गुपचूप एका लहान मुलीला देते, मुलगी ती पँट लपवते.
ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये या महिलेने आपल्या मुलीच्या मदतीने पँटची चतुराईने चोरी केल्याचं दिसत आहे. महिला ग्राहकाप्रमाणे दुकानात आल्या आणि कपड्यांकडे पाहू लागल्या. यानंतर संधी मिळताच त्यांनी कपडे चोरून तेथून पळ काढला.
हा व्हिडिओ be_harami नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २.१ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी व्हिडिओला लाईकही केलं आहे. लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं...संपूर्ण कुटुंब चोर आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले...ती एक महिला आहे आणि ती काहीही करू शकते.