शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

ऐकावं ते नवलच! 'ती' चक्क झाडाच्या प्रेमात पडली अन् लग्नगाठही बांधली, आनंदात जगतेय आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 14:51 IST

महिलेने स्वतःसाठी अतिशय वेगळा पार्टनर निवडला आहे. तिने चक्क एका झाडासोबत लग्नगाठ बांधली आहे.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. तुम्ही निवडत असलेला पार्टनर संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत काढण्यासाठी योग्य आहे की नाही याचीही खात्री करून घ्यावी लागते. तुम्हाला जर कोणी झाडाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका ब्रिटिश महिलेनं स्वतःसाठी अतिशय वेगळा पार्टनर निवडला आहे. तिने चक्क एका झाडासोबत लग्नगाठ बांधली आहे. या झाडातच आपला आयुष्यभराचा जोडीदार दिसला असं या महिलेचं म्हणणं आहे.

केट कनिंघम (Kate Cunningham) असं या महिलेचं नाव असून तिने 3 वर्षांपूर्वी झाडासोबत लग्न केलं आहे. आता झाडासोबतच्या आपल्या वैवाहिक आयुष्यात आपण भरपूर आनंदी असल्याचं या महिलेनं सांगितलं. माझं माझ्या पतीवर खूप प्रेम आहे आणि सध्या आमचं आयुष्य अतिशय परफेक्ट आहे असं देखील तिने म्हटलं आहे. अनेक लोक तिला लग्नाबाबत प्रश्न विचारतात, मात्र या सर्वांना तिला हे सांगायचं आहे की तिचं आयुष्य खूप चांगलं आणि मस्त चाललं आहे.

ग्रह-दोष मिटवण्यासाठी झाडासोबत लग्न केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मात्र या महिलेबाबत असं नाही. तिला या झाडातच आपला जोडीदार दिसला आणि साल 2019 मध्ये तिने अतिशय उत्साहात झाडासोबत लग्न केलं. आठवड्यात पाचवेळा ती आपल्या पतीला भेटायला जाते. आता ख्रिसमसमुळे तिने आपल्या पार्टनरला भरपूर सजवलं आहे. 37 वर्षाच्या केट हिने रिमॉर्स वॅली काउंटी पार्कमध्ये या झाडासोबत लग्न केलं होतं. यानंतर तिने आपलं आडनाव बदलून मिसेस एल्डर असं केलं होतं.

जेव्हा ती एखाद्याला विशिंग कार्ड पाठवते तेव्हा त्यावर मिस्टर अॅण्ड मिसेस एल्डर असं लिहिलेलं असतं. आपण तिसऱ्यांदा ख्रिसमस सोबत करत असल्याचं केटने सांगितलं. केटचं असं म्हणणं आहे की विशेषतः ख्रिसमसच्या वेळी तिचा वृक्ष पती अधिक आकर्षक दिसतो. पार्कमध्ये सतत येणं सुरू असतानाच या झाडावर आपल्याला प्रेम झाल्याचं त्यांनी सांगितलं. याच प्रेमाला त्यांनी लग्नाच्या नात्यात बदललं आणि आता अगदी आनंदात आपलं वैवाहित आयुष्य जगत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.