शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'त्याने' चॅटवर केली न्यूड फोटोंची मागणी, मुलीने जे पाठवलं ते पाहून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 13:12 IST

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा घटना नेहमी समोर येत असतात. असंच एक प्रकरण सध्या सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.

तुम्ही अनेकदा सोशल मीडियात महिलांसोबत गैरवर्तणूक केल्या गेल्याच्या घटना वाचल्या असतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा घटना नेहमी समोर येत असतात. असंच एक प्रकरण सध्या सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. स्कॉटलॅंडच्या ग्लासगोमध्ये राहणाऱ्या लॅशने तिच्या ट्विटरवरून तिचा अनुभव शेअर केला आहे. ज्यात तिने सांगितले की, एका व्यक्तीने अश्लील चॅटिंग तर केलीच सोबतच नग्न फोटोंचीही मागणी केली. मात्र, तिने या व्यक्तीसोबत असं काही केलं की, तिचं सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे.

लॅश नावाच्या तरूणीने ट्विटरवर काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. ज्यात तिने त्या व्यक्तीसोबत काय संभाषण झालं ते सांगितलं आहे. ही व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून लॅशसोबत बोलण्याचा प्रयत्न करीत होती. आणि जेव्हा लॅश त्याच्याशी बोलली तेव्हा त्याचा उद्देश कळण्यात तिला फार वेळ लागला नाही.

लॅशने बातचीत सुरूच ठेवली. बोलता बोलता समोरच्या व्यक्तीने अशी मागणी केली की, लॅश ती वाचून हैराण झाली. त्याने तिला तिचे काही नग्न फोटो पाठवण्यास सांगितले. या फोटोंऐवजी ती व्यक्ती लॅशला पैसे सुद्धा देण्यास तयार होती. लॅशने लगेच त्याला होकार दिला.निक नावाच्या व्यक्तीने लॅशसमोर मागणी ठेवली की, जर तिचे नग्न फोटो मिळाले तर तो तिला ३० पाउंड(जवळपास २३०० रूपये) देईल.

लॅशने त्याची मागणी मान्य केली आणि पैसे पाठवण्यासाठी तिने तिचे पेपल अकाऊंट दिलं. निकने लगेच तिला ३० पाऊंड पाठवले.त्यानंतर लॅशने त्याच्यासोबत जे केलं ते मजेदार ठरलं. लॅशने त्याला एक असा फोटो पाठवला, जो पाहून निकने कपाळावर हात मारून घेतला असावा. निककडून पैसे मिळताच लॅशने हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर दिली. आणि याचा एक फोटो काढून निकला पाठवला.

ट्विटरवर लोक लॅशने निकला शिकवलेल्या धड्याचं कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'अशा लोकांना अद्दल घडवण्याचा हा सर्वात चांगला पर्याय आहे'. तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, 'निक आता पुढे कधीच अशाप्रकारचं चॅटिंग करण्याआधी शंभर वेळा विचार करेल'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया