शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रात्री उशीरा घरी परतली महिला अन् सकाळी कारची डिक्की उघडून पाहिली तर बसला धक्का!, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 12:50 IST

एका महिलेला तिच्या कारच्या डिक्कीमध्ये असं काही पाहायला मिळालं की जे पाहून तिला जोरदार धक्का बसला. कारच्या डिक्कीच्या आत जे होतं ते पाहून ती जोरात किंचाळली आणि तातडीनं पोलिसांना पाचारण केलं.

एका महिलेला तिच्या कारच्या डिक्कीमध्ये असं काही पाहायला मिळालं की जे पाहून तिला जोरदार धक्का बसला. कारच्या डिक्कीच्या आत जे होतं ते पाहून ती जोरात किंचाळली आणि तातडीनं पोलिसांना पाचारण केलं. त्यानंतर समजलं की गेल्या तीन दिवसांपासून एक अनोळखी व्यक्ती तिच्या कारच्या डिक्कीमध्ये होता. तेही निवस्त्र. 

संपूर्ण घटनेची माहिती कार मालक महिलेनं एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. 'डेली स्टार'च्या अहवालानुसार अमेरिकेत राहणाऱ्या या महिलेचं नाव बेथनी कोकर असं आहे. बेथनीनं सांगितलं की एकेदिवशी रात्री उशीरा घरी परतल्यानंतर तिनं आपली कार घराच्या गेटजवळच पार्क केली होती. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तिनं आपली कार पाहिली तेव्हा ती खूप खराब झाल्याचं तिच्या लक्षात आलं. 

कारच्या आतल्या सीटवर माती पसरली होती. कारमधली परिस्थिती पाहून असं वाटत होतं की कुणीतरी रात्रभर कारमध्ये होतं. अशातच बेथनीचं लक्ष तिच्या कारच्या डिक्कीकडे गेलं आणि पुढे जे घडलं ते तिच्यासाठी आश्चर्यकारक ठरलं. डिक्की उघडताच तिला धक्का बसला. एक व्यक्ती निवस्त्र अवस्थेत डिक्कीत झोपला होता. त्याच्या पायांना माती लागली होती. या व्यक्तीमुळेच आपली कार खराब झाल्याचं तिच्या लक्षात आलं. बेथनीनं क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना फोन केला आणि संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला कारच्या डिक्कीतून बाहेर काढलं. 

पोलिसांनी जेव्हा या व्यक्तीला कारच्या डिक्कीत का शिरला होतास असं विचारलं असता त्यानं आपण पोपचा मुलगा असल्याचं सांगितलं. कारमध्ये झोपल्यानं थेट ईश्वराशी बोलता येतं, असं तो बोलू लागला. पोलिसांनी अधिक तपास केला असता संबंधित व्यक्ती एका मनोरुग्णालयातून पळून आलेला असल्याचं समोर आलं. तो गेले तीन दिवस रात्रीचा याच कारच्या डिक्कीत किंवा कारमध्ये झोपायचा असंही चौकशीतून समोर आलं.

टॅग्स :USअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरल