शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नमंडपात घडला अजब प्रकार! होणारी बायकोच निघाली नवऱ्याची बहीण, त्यानंतर जे घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 08:14 IST

ही घटना चीनच्या जिआनग्सू प्रांतातील सोझोऊ येथील आहे. ३१ मार्च रोजी हे लग्न सुरू होतं. चीनी मीडियामध्ये ही बातमी प्रसारीत झाली आहे.

चीनमध्ये एक अजबगजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एक लग्न समारंभ सुरू होता. तेव्हा नवरदेवाच्या आईची नजर नवरीच्या हातांवर पडली. त्यानंतर जे काही घडलं त्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. यानंतर नवरदेवाची आई जोरजोराने रडू लागली.

डेलीस्टारच्या वृत्तानुसार, ज्या वर-वधुचं लग्न सुरू होतं ते दोघंही भाऊ-बहिण निघाले. नवरदेवाच्या आईने जेव्हा नवरीच्या हातावर जन्मखून पाहिलं आणि तिने तिच्या मुलीला ओळखलं. ही घटना चीनच्या जिआनग्सू प्रांतातील सोझोऊ येथील आहे. ३१ मार्च रोजी हे लग्न सुरू होतं. चीनी मीडियामध्ये ही बातमी प्रसारीत झाली आहे. ज्यावेळी नवरदेवाच्या आईने नवरीच्या हातावरील जन्माच्या वेळचं चिन्ह पाहिलं त्यानंतर तिने नवरीच्या आईवडिलांकडे याबाबत विचारणा केली.

त्यावेळी नवरीच्या आईवडिलांनी या मुलीला आम्ही २० वर्षापूर्वी दत्तक घेतल्याचं सांगितले. ही मुलगी आम्हाला रस्त्याच्या कडेला सापडली होती. त्यानंतर नवरदेवाच्या आईने २० वर्षापूर्वीची घटना सांगितली. आई आणि मुलीची भेट झाली. या प्रसंगाने उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या वर-वधुचं लग्न सुरू होतं ते दोघंही भाऊ बहिण निघाले. मात्र या कहानीत जबरदस्त ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा हे सुरू असलेलं लग्न कोणीही थांबवलं नाही.

कारण नवरदेवाच्या आईनेही नवऱ्याला दत्तक घेतलं होतं. नवरीच्या खऱ्या आईला या लग्नाबाबत काही हरकत नव्हती. स्थानिक माध्यमांनुसार, २० वर्षापूर्वी आई आणि मुलगी यांच्यात दुरावा आला होता. ही मुलगी हरवली होती. आईने तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिचा शोध लागला नाही. जेव्हा मुलगी सापडली नाही तेव्हा आईने मुलगा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. आता इतक्या वर्षांनी जेव्हा त्या दत्तक मुलाचं लग्न ठरलं. मुलगी पसंत पडली. या दोघांचे लग्न सुरू असताना हा प्रकार समोर आला. ज्या मुलाला दत्तक घेतलं त्याच मुलासोबत तिच्या मुलीचं लग्न पार पाडलं. लग्नात हजर असणारे सर्वजण भावूक झाले होते. पाहुण्यांनी आई-मुलीला शुभेच्छा दिल्या.  

टॅग्स :marriageलग्न