शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 21:01 IST

पाच वर्षांपूर्वी भारतात बंदी घातलेला टिकटॉक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टिकटॉक भारतात परत येत असल्याचे बोलले जात आहे.

भारतात टिकटॉकचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात होते. पाच वर्षांपूर्वी भारतात बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा टिकटॉक चर्चेत आले आहे. टिकटॉक भारतात परत येत असल्याचे बोलले जात आहे. हे प्लॅटफॉर्म चीनचे आहे. काही वापरकर्त्यांनीटीकटॉकची वेबसाईट एक्सेस केल्याची माहिती सोशल मीडियालवर दिली. यामुळे टिकटॉक भारतात परतण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. टिकटॉक अॅप अजूनही गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध नाही. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने जून २०२० मध्ये भारतात टिकटॉकवर बंदी घातली होती.

भारतात या छोट्या व्हिडीओ अॅपच्या परतण्याबाबत टिकटॉक किंवा त्याची मूळ कंपनी बाइटडान्सकडून अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी, वेबसाइट परतल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली आहे. काही वापरकर्त्यांनी एक्सवर याबाबत लिहिले आहे. 

२०२० मध्ये बंदी

पाच वर्षांपूर्वी जून २०२० मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने टिकटॉक आणि इतर अनेक लोकप्रिय चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यावेळी सरकारने देशात शेअरइट, एमआय व्हिडीओ कॉल, क्लब फॅक्टरी आणि कॅम स्कॅनरसह ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. केंद्राने टिकटॉक तसेच इतर अॅप्सवर बंदी घालण्याचे कारण राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचे सांगितले.  त्यावेळी भारतात टिकटॉकचे सुमारे २०० दशलक्ष वापरकर्ते होते.

हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांचा डेटा चीन सरकारसोबत शेअर करतात अशी माहिती समोर आली होती.  'हे अ‍ॅप्स भारताच्या सार्वभौमत्वाला, अखंडतेला आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात', असं  भारताच्या आयटी मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले होते.

टॅग्स :SocialसामाजिकTik Tok Appटिक-टॉक