प्रवाशांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या घटना भारतीय रेल्वेसाठी चिंतेचा विषय आहेत. रेल्वे वारंवार आवाहन करत असूनही, अनेक प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा धोका पत्करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात घालतात. असाच एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करते आणि पाय घसरून खाली पडते. सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफच्या जवानामुळे महिला थोडक्यात बचावते.
तामिळनाडूतील इरोड जंक्शनवर ही घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, ट्रेनमध्ये चढताना तिचा तोल जातो आणि ती घसरून खाली पडली. महिलेला पडताना पाहताच, तिथे उपस्थित असलेला एक धाडसी आरपीएफ कॉन्स्टेबल ताबडतोब तिच्या मदतीला धावतो आणि महिलेला पकडून प्लॅटफॉर्मवर ओढतो. या आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि समयसूचकतेमुळे महिलेचा जीव वाचला.
रेल्वेचे नागरिकांना आवाहन
हा व्हिडिओ @RailMinIndia या अधिकृत हँडलने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, ट्रेन पूर्णपणे थांबल्यानंतरच चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करावा. प्रवाशांनी आपल्या सुरक्षिततेसाठी रेल्वेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ प्रवाशांनी निष्काळजीपणा टाळण्यासाठी एक मोठी शिकवण देणारा आहे.जाऊन तिला पकडतो आणि तिला प्लॅटफॉर्मवर ओढतो.
Web Summary : A woman slipped while boarding a moving train in Tamil Nadu. An alert RPF constable saved her. Railways urges passengers to board only after the train stops.
Web Summary : तमिलनाडु में चलती ट्रेन में चढ़ते समय एक महिला फिसल गई। सतर्क आरपीएफ कांस्टेबल ने उसे बचाया। रेलवे यात्रियों से ट्रेन रुकने के बाद ही चढ़ने का आग्रह करता है।