शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वाहतूक पोलिसाला झाडू मारताना पाहून नेटिझन्सनी केलं सॅल्यूट; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

By manali.bagul | Updated: October 26, 2020 15:30 IST

Viral Video Of traffic police :कोणत्याही कामाला कमी न लेखता सगळी काम करण्यासाठी हे कर्मचारी सेवेसाठी हजर असतात.

सोशल मीडियावर एका वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रात्रं दिवस, उन्हातान्हात आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य करत असतात. कामावर हजर असताना अनेक अनपेक्षित प्रसंगांना या योद्ध्यांना तोंड द्यावं लागतं. तरीही कोणत्याही कामाला कमी न लेखता सगळी काम करण्यासाठी हे कर्मचारी सेवेसाठी हजर असतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @Tazeen Qureshi या ट्विटर युजरने शेअर केला आहे.  १७ ऑक्टोबरला हा  व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.   कर्तव्यावर हजर असलेला वाहतूक पोलिस रस्त्यावरची धूळ झाडूने साफ करत होता.  जेणेकरून कोणतेही वाहनं घसरून अपघात होऊ नये. रस्त्यावर झाडू मारण्यामागचं हे कारण  माहीत झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्स भारावून गेले आहेत. आतापर्यंत २२ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून दीड हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. शेकडो लोकांनी वाहतूक पोलिसाच्या कामाचे कौतुक केले आहे. Video : 'मास्क क्यू नही लगाते?' असं विचारल्यास पठ्ठ्याने जे उत्तर दिलं ऐकून पोट धरून हसाल...

ओरिसापोस्टच्या माहितीमुसार हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी सुधांशू सारंगी यांनी वाहतूक पोलिस ललीत मोहन यांना सन्मानित केलं आहे.  ललीत यांनी सांगितले की, ''रस्त्यावर पडलेली रेती आणि माती यांमुळे दुपारच्यावेळी वाहन चालकांना त्रास  होतो. अनेकदा जास्त धूळ, रेतीमुळे दुर्घटनेचाही सामना करावा लागतो म्हणून मी  हातात झाडू घेऊन रस्ता साफ करण्याचा निर्णय घेतला.''  अन्य पोलिसांनीही ललीत यांना हे काम करण्यासाठी मदत केली होती.  वाह, नशीब चमकलं! मासेमाराच्या गळाला लागला ७५० किलोंचा दुर्मिळ 'मंटा-रे' मासा, पाहा फोटो

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलOdishaओदिशाtraffic policeवाहतूक पोलीसInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी