शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:48 IST

Hyderabad Airport Robot : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने भारतातील पहिल्या 'फूड डिलिव्हरी रोबोट'ची सुरुवात केली आहे.

प्रवाशांची गर्दी, चेक-इनची धांदल, सुरक्षा तपासणी आणि गेटकडे पळण्याची घाई… विमानतळावरील ही धावपळ नेहमीचीच असते. अशा गोंधळात, काहीतरी खाण्यासाठी वेळ काढणे म्हणजे एक आव्हानच असते. पण, हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने यावर एक अनोखा उपाय शोधला आहे. त्यांनी भारतातील पहिल्या 'फूड डिलिव्हरी रोबोट'ची सुरुवात केली आहे. आजवर आपण परदेशातील असे रोबोट नक्की पाहिले असतील, पण आता भारतातील या रोबोटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

कसा काम करतो हा रोबोट?

हैदराबाद विमानतळावरील हा एआयवर चालणार रोबोट आता प्रवाशांना थेट त्यांच्या गेटवर जेवण आणि ड्रिंक्स पोहोचवत आहे. सध्या हा रोबोट आंतरराष्ट्रीय टर्मिनलवरील गेट क्रमांक ३३, ३४ आणि ३५ तसेच, देशांतर्गत टर्मिनलवरील गेट क्रमांक ११० आणि १११ येथे सेवा देत आहे.

ऑर्डर कशी द्यायची?

विमानतळावरची ही रोबोट सुविधा वापरण्यासाठी प्रवाशांना चेक-इननंतर किंवा थेट रोबोटवर दिलेल्या क्युआर कोडला स्कॅन करायचे आहे. स्कॅन केल्यानंतर, मोबाईलवर मेनू दिसेल, ज्यात 'पिस्ता हाऊस', 'युनायटेड किचन्स ऑफ इंडिया' आणि 'मिनर्वा कॉफी शॉप' यांसारख्या रेस्टॉरंट्सचे पर्याय उपलब्ध आहेत. ऑर्डर निवडल्यानंतर आणि पैसे भरल्यानंतर, ग्राहकाच्या मोबाईलवर एक ओटीपी येतो.

यानंतर रोबोट रेस्टॉरंटमधून जेवण घेतो, आपल्या कंपार्टमेंटमध्ये ठेवतो आणि थेट ग्राहकाच्या गेटवर पोहोचतो. रोबोटच्या स्क्रीनवर ओटीपी टाकून ग्राहक आपले जेवण घेऊ शकतात.

या रोबोटची खास वैशिष्ट्ये काय आहेत?हा रोबोट केवळ सुविधाच देत नाही, तर तो मनोरंजकही आहे. ग्राहक आपल्या फोनवर रोबोटचा मार्ग पाहू शकतात. याची बॅटरी १२ तास चालते आणि एआय आधारित नेव्हिगेशनमुळे तो सहजपणे मार्ग शोधतो. जर रोबोटच्या मार्गात काही अडथळा आला तर तो, "कृपया मला वाट द्या, मला एक डिलिव्हरी करायची आहे," असे म्हणतो.

हा रोबोट ड्रिंक्स साधारणपणे ८ मिनिटांत आणि जेवण १५ मिनिटांत पोहोचवतो. यामुळे, रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचतो आणि प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटच्या वेळेची काळजी करण्याची गरज नाही.

प्रवाशी काय म्हणाले?प्रवाशांनी या अनोख्या रोबोटचे जोरदार स्वागत केले आहे. अनेक लोक त्याच्यासोबत फोटो काढत आहेत आणि सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर करत आहेत. यामुळे विमानतळावरील खाण्यापिण्याचा अनुभव अधिक सोयीचा आणि आनंददायी झाला आहे. हैदराबाद विमानतळाचा हा प्रयोग भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू करत आहे. सध्या काही गेट्सवर ही सेवा उपलब्ध असली तरी भविष्यात तिचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओAirportविमानतळRobotरोबोटtechnologyतंत्रज्ञान