शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

Viral : एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी मुलीने बुक केली गाडी, कारण ऐकलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:53 IST

सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका मुलीने चक्क एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी गाडी बुक केल्याचे दिसत आहे.

बरेचदा लोक दूरच अंतर पार करण्यासाठी, लांब जाण्यासाठी ऑनलाईन गाडी बुक करतात. पण, आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका मुलीने चक्क एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी गाडी बुक केल्याचे दिसत आहे. आता अवघ्या १८० मीटर रस्ता पार करण्यासाठी तिने गाडी का बुक केली, असा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडला असेल. यामागचं कारण ऐकून तुम्हालाही हसू येईल.   

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये एका मुलीने अशा कारणासाठी बाईक बुक केली आहे, जे ऐकून लोक हसत आहेत. मुलीने ओलामधून १ किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटरसाठी नाही तर १८० मीटरसाठी बाईक बुक केली आहे. कारण पुढच्या गल्लीत कुत्रे आहेत. ज्याच्या भीतीमुळे ती पायी जायला घाबरत आहे. या मुलीने गाडी बुक करताच, जेव्हा बाईक रायडर येतो आणि तिला इतकया कमी अंतरावर जाण्यासाठी गाडी का बुक केली असं विचारतो, ती कारण सांगते.

ड्रॉप लोकेशन अवघ्या १८० मीटरवर!

रायडर त्याच्या हेड कॅमेरासह त्या मुलीकडे पोहोचतो, तेव्हा तो तिला राईड सुरू करण्यासाठी ओटीपी मागतो. ओटीपी शेअर केल्यानंतर, ड्रायव्हरला तिचे ड्रॉप लोकेशन कळते. ते अवघ्या १८० मीटर अंतरावर असते. त्यानंतर तो मुलीला याबद्दल विचारतो. उत्तर देताना ती सांगते की, पुढच्या रस्त्यावर कुत्रे आहे. या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी तिने ही राईड बुक केली आहे. यानंतर ती मुलगी बाईकवर बसते आणि ती तिच्या ठिकाणी पोहोचताच राईड संपते. त्यानंतर रायडर तिच्याकडे १९ रुपये मागतो. त्यांचा हा ६० सेकंदांचा व्हिडीओ  इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झाला आहे.

कमिशनचे पैसे डॉगेश भाऊंना! 

इन्स्टाग्रामवर ही रील 'rohitvlogster'ने पोस्ट केली आहे. आतापर्यंत या रीलला ४५ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर, पोस्टवर १४०० हून अधिक कमेंट्स देखील आल्या आहेत. एका वापरकर्त्याने कमेंटमध्ये लिहिले की,"भाऊ ते कामिशनचे पैसे आता डॉगेश भाऊंना द्या." दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, "एका मुलीला सुरक्षित तिच्या ठिकाणी पोहोचवल्याबद्दल धन्यवाद भाऊ." आणखी एका वापरकर्त्याने म्हटले की, "इंजेक्शन घेण्याऐवजी १९ रुपये देणे चांगले." 

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरल