शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 20:23 IST

Woman Removes Sticker Of Pakistan Flag From Stairs: मुंबईतील विलेपार्ले रेल्वेस्थानकाबाहेर पायऱ्यांवर पाकिस्तानी झेंडा पाहून एका मुस्लीम महिलेने लोकांशी वाद घातला.

जम्मू- काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशती हल्ल्यावरून संपूर्ण देशात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. तर, काही ठिकाणी मुस्लिमांचे पाकिस्तानबद्दलचे प्रेमही स्पष्टपणे दिसून आले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही असाच प्रकार पाहायला मिळाला. मुंबईतील विलेपार्ले रेल्वेस्थानकाबाहेर पायऱ्यांवर पाकिस्तानी झेंडा लावला. यानंतर तिथून जाणाऱ्या एका मुस्लीम महिलेने ते पाहिले आणि लोकांशी वाद घालायला सुरुवात केली. पुढे महिलेने स्वतः पायऱ्यांवरून पाकिस्तानी ध्वज काढले. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकावर ४ मे २०२५ रोजी घडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा निषेध करण्यासाठी विले पार्ले स्थानकाबाहेर काही रिक्षाचालकांनी पायऱ्यांवर पाकिस्तानी झेंडे लावले. यानंतर तिथून जाणाऱ्या एका महिलेने आणि तिच्या मुलाने गोंधळ घातला. तसेच पाकिस्तानी झेंडे काढायला सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी याचा निषेध केला. तेव्हा महिलेने त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. व्हिडिओत संबंधित महिला तुम्ही पाकिस्तानचा झेंडा जमिनीवर का लावला? असा प्रश्न विचारत आहे.

पायऱ्यांवर लावलेले पाकिस्तानी ध्वज काढताना महिलेने तिथे उपस्थित असलेल्या लोकांना पोलिसांची धमकी दिली. मला कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला. तर, मी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करेल, असे त्या महिलेने म्हटले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यांनुसार, या घटनेनंतर पोलिसांनी स्वतःहून ते झेंडे काढून टाकले.

व्हिडिओमध्ये दिसणारी महिला कुठे राहते किंवा ती कुठून आली? हे कोणालाही माहिती नाही. ती महिला दुसऱ्या ठिकाणाहून रेल्वे स्थानकावर आली, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली. मात्र, पोलिसांनी अद्याप या प्रकरणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओMumbaiमुंबई