शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आजारी आईसाठी रडत होती चिमुरडी; कोणीच मदतीला आलं नाही, अखेर JCB मधून रुग्णालय गाठलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 20:45 IST

womans body taken to hospital in jcb : जीवघेण्या कोरोनाच्या भीतीनं कोणीही एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येत नाहीये. अशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे. 

कोरोना माहामारीच्या स्थितीत खूप गंभीर आणि भयंकर प्रसंगाना लोकांना तोंड द्यावं लागत आहे. ऑक्सिजनची कमतरता, बेड्स उपलब्ध नसणं, औषधांची टंचाई, माणसं दुरावणं यामुळे सगळ्याच स्तरातील लोकांवर प्रचंड ताण येत आहे. जीवघेण्या कोरोनाच्या भीतीनं कोणीही एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येत नाहीये. अशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे. 

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला बेशुद्धावस्थेत पडली आहे.  कोरोनाच्या भीतीनं या महिलेला कोणीही रुग्णालयाात घेऊन जायला तयार नाही. नाईलाजानं या महिलेला जीसीबीमध्ये बसवून रुग्णालयात नेण्यात आलं.  मात्र, तोपर्यंत या महिलेला मृत घोषित करण्यात आलं होतं. 

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ही महिला बेशुद्ध झाली. तेव्हा लोक आपल्या वाहनांचा वापर करण्यााठी घाबरत होते. कोणाीही रुग्णालयात फोन करून रुग्णवाहिका बोलावण्याचेही कष्ट घेतले नाही. अखेर जेसीबी मशिनने या महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं.

नुकत्याच बऱ्या झालेल्या आजींनी डॉक्टरांना मारली मीठी; समोर आला मन हेलावून टाकणारा फोटो

या महिलचें वय ४२ वर्ष आणि तीचे नाव चंद्रकला होते. आपल्या लहान मुलीसह ती वास्तव्यास होती.  मिळेल ते लहान मोठे काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होती.  या महिलेची रात्रीच्या  सुमारात अचानक तब्येत बिघडल्यानं या दुर्दैवी प्रसंग ओढावला.

या महिलेची लहान मुलगी रडत होती. तरी कोणीही मदतीला धावून आले नाही. रिपोर्टनुसार ६ वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीचं निधन झालं होतं. त्यामुळे  १० वर्षांचा मुलगा आणि १२ वर्षीय मुलीची संपूर्ण जबाबदारी या महिलेवरच होती. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरल