शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

Video: महिलेचा मेकअप पाहिला अन् मुलगा जोरजोरात रडायला लागला; स्वत:च्या आईलाच ओळखलं नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 10:26 IST

हा व्हिडिओ सोशल मीडियावर एकाने पोस्ट केला. त्याला हजारोने लोकांचे लाईक्स मिळत आहे.

सोशल मीडियावर सध्या आई-मुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. जो पाहून लोकांना हसू आवरत नाही. या महिलेने इतका जास्त मेकअप केलाय की तिचा स्वत:चा मुलगाही तिला ओळखू शकत नाही. इतकेच नाही तर या महिलेसमोरच तो आई कुठे आहे असं विचारत जोरजोरात रडायला लागला. तिथेच उपस्थित एकाने हा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. आता व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून नेटिझन्सही त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत स्पष्ट दिसते की मुलगा सोफ्यावर बसून रडत असतो. इतक्यात त्याची आई त्याला शांत करण्यासाठी येते परंतु त्या आईलाच मुलगा ओळखू शकत नव्हता. महिलेने मेकअप केला होता. त्यामुळे मुलाला आईला ओळखणे कठीण झाले. ही दुसरी कुणी महिला आहे असं समजून तो महिलेला माझी आई कुठे आहे असं सांगत पाय आपटत रडू लागतो. व्हिडिओ दुसरी महिला हीच तुझी आई आहे असं मुलाला सांगण्याचा प्रयत्न करते परंतु मुलगा काहीही ऐकण्यास तयार नसतो. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर एकाने पोस्ट केला. त्याला हजारोने लोकांचे लाईक्स मिळत आहे. नेटिझन्स भन्नाट कमेंट्स करत आहेत. जवळपास १० लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक्स केले आहे. मेकअप केल्यामुळे मुलगा त्याच्या आईला ओळखू शकत नाही असं एका युजरने म्हटलं. तर काही जणांच्या प्रतिक्रिया इतक्या मजेशीर आहेत की तुम्हीही पोटधरून हसाल. 

या व्हायरल व्हिडिओवर एका महिलेने कमेंट करत म्हटलंय की, बेटा, प्रत्येक वेळी आईला भूत बनवून ठेवणार का कधीतरी तिला परी बनायला दे. तर दुसऱ्या युजरने सांगितले की, हा मुलगा आता इतका रडतो तर त्याच्या पत्नीला पाहून किती रडेल. तर अन्य एकाने महिलेला तोंड धुवून येण्याचा सल्ला दिला.