शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

Video : पालघर मार्गे गुजरात, पुलावरुन रिक्षावाल्याचा भन्नाट प्रवास; स्वप्नील जोशीलाही पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 15:09 IST

सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. पालघरच्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन क्रॉस करण्यासाठी रिक्षाचालकाने चक्क पादचारी पुलाचा वापर केल्याचा हा व्हिडिओ आहे

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अन् कधीकाळचा एक रिक्षावाला महाराष्ट्राचा प्रमुख झाला, याचा आनंद रिक्षावाल्यांनी साजरा केला. शिंदेंच्या ठाण्यात रिक्षावाल्यांनी रॅली काढून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. मात्र, नेहमीच आपल्या वादग्रस्त शैलीमुळे चर्चेत असलेल्या रिक्षावाल्यांचे अनेकदा व्हिडिओ व्हायरल होतात. आता, पुन्हा एकदा एका रिक्षावाल्याचा भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. चक्क पादचारी पुलावरुन या रिक्षाचालकाने आपली रिक्षा घेऊन मार्गक्रमण केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, ट्विटरवर काहींना हा व्हिडिओ शेअर करत एकनाथ शिदें भाजपाकडे याच गेले, असे म्हटले आहे. या व्हिडिओवरुन काही मिम्सही बनले आहेत.  

सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. पालघरच्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन क्रॉस करण्यासाठी रिक्षाचालकाने चक्क पादचारी पुलाचा वापर केल्याचा हा व्हिडिओ आहे. पादचारी पुलावरून चाललेला रिक्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यावर अनेक कमेंट आणि लाईक्सचा तर पाऊसच पडतोय. पालघर जिल्ह्यातील भारोल या गावाच्या परिसरात हा पादचारी पुल आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग ओलांडण्यासाठी रिक्षाचालकाने चक्क पब्लिक ब्रिजचाच वापर केला आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे पालघर मार्गेच सुरतला गेले होते, त्यामुळे अनेकांनी त्याच्याशी या रिक्षावाल्याचं कनेक्शन मजेशीर जोडलं आहे  मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह त्याने प्रश्नार्थक कॅप्शन दिले आहे. असं कोण करतं यार... असे स्वप्नीलने म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, मुंबई अहमदाबाद महामार्गावर भारोल हद्दीत आजूबाजूच्या लोकांना महामार्ग क्रॉस करण्यासाठी हा पादचारी पुल बांधलेला आहे. पण या रिक्षा चालकाच्या या व्हायरल व्हिडिओने हा ब्रिज चांगलाच चर्चेत आला आहे.

आमदार मिटकरींनीही शेअर केला व्हिडिओ

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर या रिक्षाचालकाच्या ब्रिजवरील व्हिडीओला आजच्या राजकारणाचासंबंध जोडून तो सोशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडीओचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. असल्यास केवळ योगायोग समजावा, असं आमदार मिटकरी यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेauto rickshawऑटो रिक्षाSocial Viralसोशल व्हायरलpalgharपालघर