शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात काम करणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल; उपस्थित असलेल्यांपैकी एकानं खरं काय ते पोस्ट केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 10:36 IST

हे वर्णन वाचून प्रश्न पडला असेल, की नेमके काय झाले. तर एका मराठमाेळ्या लग्नात ही माेठी गंमत झाली.

ठळक मुद्देलग्नमंडपात नवरदेव लॅपटाॅप घेऊन काम करताना दिसताे. तर, भटजींसह इतर मंडळी त्याच्या प्रतीक्षेत बसलेले दिसतात नवरी मात्र निवांतपणे बसून अगदी खदखदून हसताना दिसतेकाही मिनिटांतच नवरदेव काम पूर्ण करून लॅपटाॅप दुसऱ्याला देताे आणि लग्नासाठी उभा राहताे.

मुंबई : काेराेना महामारीच्या काळात ‘वर्क फ्राॅम हाेम’ अर्थात घरातूनच काम करण्याची संकल्पना रुजली. घरात बसून काम करताना अनेकांना गमतीशीर अनुभवांना सामाेरे जावे लागले. आताही एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा फाेटाे व्हिडीओ आहे एका लग्नातला आणि त्यात चक्क नवरदेव बाेहल्यावर चढण्यापूर्वी लॅपटाॅप मांडीवर घेऊन काम करताना दिसत आहे. तर त्याच्या या अवस्थेवर नवरी खदखदून हसताना दिसते. 

हे वर्णन वाचून प्रश्न पडला असेल, की नेमके काय झाले. तर एका मराठमाेळ्या लग्नात ही माेठी गंमत झाली. लग्नमंडपात नवरदेव लॅपटाॅप घेऊन काम करताना दिसताे. तर, भटजींसह इतर मंडळी त्याच्या प्रतीक्षेत बसलेले दिसतात. नवरी मात्र निवांतपणे बसून अगदी खदखदून हसताना दिसते. तिला पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. काही मिनिटांतच नवरदेव काम पूर्ण करून लॅपटाॅप दुसऱ्याला देताे आणि लग्नासाठी उभा राहताे.

काम करत नव्हता तर...स्वत:च्या लग्नापेक्षा एवढे महत्त्वाचे काय असू शकते, हा प्रश्न अनेकांना पडला. अखेर या लग्नात उपस्थित असलेल्या काहींनी खरं काय ते पाेस्ट केले. नवरदेव काम करत नव्हता तर ताे व्हिडीओ काॅल सेटअप करत हाेता. जेणेकरून इतर निकटवर्तीयांना व्हर्च्युअल पद्धतीने हजेरी लावता यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

नेटकरी म्हणतात...यावर मजेदार कॅप्शन्स नेटकऱ्यांनी टाकल्या. हे वर्क फ्राॅम हाेम नव्हे तर ‘वर्क फ्राॅम वेडिंग’ असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. अनेकांनी नवरदेवाच्या साहेबांचा ‘उद्धार’ केला. काहींनी ताे पूर्व प्रेयसीची छायाचित्रे डिलीट करत असेल, अशा भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. काहींनी कामाच्या ताणावरून अतिशय गंभीर प्रतिक्रिया दिल्या. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न