शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 21:46 IST

सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Viral Python Video : अजगराची जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये गणना केली जाते. अजगर असा प्राणी आहे, जो आपल्या भक्ष्याला आधी विळखा घालतो आणि नंतर जिवंत गिळतो. प्राणी असो वा माणूस, अजगराच्या तावडीत सापडल्यावर सुटका करणे जवळजवळ अशक्य काम आहे. पण, एका महिलेने मोठे शौर्य दाखवत दोन तास अजगराशी झुंज दिली आणि त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेतली आहे. 

अजगराचा महिलेच्या शरीराला विळखासध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय, ज्यात एका महाकाय अजगराने त्या महिलेला आपले भक्ष बनवण्यासाठी विळखा घातल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अजगर महिलेच्या संपूर्ण शरीराभोवती गुंडाळलेला आहे. तो महिलेचा श्वास बंद करण्यासाठी पूर्ण जोर लावतोय, तर महिलादेखील मोठ्या शौर्याने त्याचा सामना करत आहे. ती अजगराच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करतीये. शेवटी बचाव पथकाने महिलेची अजगराच्या तावडीतून पूर्णपणे सुटका केली.

थायलंडमध्ये घडलेली घटना व्हिडिओमध्ये दिसणारी महिला थायलंडची असून तिचे नाव अरोम अरुणरोज (वय 64 ) आहे. महिलेने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, ती स्वयंपाकघरात भांडी धूत बसली होती, त्यावेळी अचानक अजगराने तिच्यावर हल्ला केला आणि विळखा घातला. तिने अजगरापासून स्वत:ला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अजगराने तिला अशा प्रकारे पकडले होते की, तिला उभेही राहता येत नव्हते. हळूहळू अजगराने आपली पकड इतकी घट्ट केली की, महिलेला हालचाल करणे कठीण झाले. ती दरवाजाजवळ पडून राहिली.

बचाव पथकाने केली सुटका महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी मदतीसाठी तिचे घर गाठले. शेजाऱ्यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांना फोन करून आपत्कालीन पथकाला महिलेच्या घरी बोलावले. काही वेळातच रेस्क्यू टीम महिलेपर्यंत पोहोचली. टीम पोहोचली, तेव्हा त्यांनी पाहिले की अजगराने महिलेचा गळा दाबला होता आणि तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता. अशा स्थितीत टीमने आधी अजगराचे तोंड पकडले आणि नंतर हळूहळू महिलेची सुटका केली. महिलेला वाचवण्यासाठी टीमला किमान 2 तास लागले. या घटनेत महिलेला किरकोळ दुखापत झाली. 

टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया