शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

डिलिव्हरी बॉयचा कारनामा! Uber Eats च्या ड्रायव्हरने चोरलं ऑर्डरमधील जेवण अन्...; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 12:14 IST

Uber Eats driver steals portion of customers food : डिलिव्हरी बॉयने ऑर्डरमधील जेवण चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या Uber Eats च्या ड्रायव्हरचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याकडे अनेकांचा सध्या अधिक कल असतो. एकदा जेवण ऑर्डर केल्यानंतर ते कधी घरी येतं असंच अनेकांना वाटतं असतं. मोबाईलमध्ये अनेकदा आपण त्याचं लोकेशन देखील पाहत असतो. मात्र तुम्हाला खूप भूक लागलेली असताना जर ऑर्डर घरी आली नाही अथवा ऐन वेळी ऑर्डर कॅन्सल केली तर प्रचंड संताप होतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने ऑर्डरमधील जेवण चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या Uber Eats च्या ड्रायव्हरचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

Uber Eats चा ड्रायव्हर रस्त्याच्या कडेला बसून ऑर्डरमधून थोडं-थोडं जेवण चोरताना दिसत आहे. यातील काही पदार्थ काढून घेतल्यानंतर तो पुन्हा बॉक्स सील करतो आणि डिलिव्हरीसाठी निघतो. व्हिडीओमध्ये ड्रायव्हर आपल्या हाताने नूडल्स काढून प्लास्टिकच्या एका वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवतो. तसेच नूडल्सनंतर तो काही पीस आणि सूपदेखील त्याच डब्यामध्ये काढून घेतो, ज्यात त्याने नूडल्स काढले आहेत. यानंतर तो सगळे बॉक्स पुन्हा एकदा सील करून आपली सायकल घेऊन तिथून निघतो असं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडिय़ावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर Uber Eats ने कारवाई करत या डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढून टाकलं आहे आणि ग्राहकाची माफी मागितली आहे. तसेच अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. याआधीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एक अजब घटना समोर आली होती. डिलिव्हरी बॉयने जेवणाची ऑर्डरच संपवल्याचा प्रकार समोर आला होता. लंडनमधील इली इलियास या 21 वर्षीय तरुणीने जेवणाची ऑर्डर केली होती. तिने बर्गर, चिप्स, आणि चिकन रॅपर अशी साधारण 20 डॉलर म्हणजेच साधारण 1456 रुपयांची ऑर्डर केली होती. तिने उबर इट्समधून (Uber Eats) ही ऑर्डर केली होती. मात्र बराच वेळ झाला तरी तरुणीची ऑर्डर काही आली नाही. 

काही वेळानंतर तिला एक मेसेज आला. तो पाहून तर तिला धक्काच बसला. "सॉरी love, मी तुझं जेवण खाल्लं" असा मेसेज डिलिव्हरी बॉयने केला होता. इतकच नाही तर अ‍ॅपमध्ये जेवणाची ऑर्डर डिलिव्हर झाल्याचं दाखवत होतं. इलियाने या मेसेजचा एक स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला आणि हा उबेर इट्सचा ड्रायव्हर ठीक आहे ना, असा सवाल केला. त्यानंतर मात्र उबरने तिच्याशी संपर्क साधला व तिला मोफत जेवण पाठवलं होतं. मात्र या प्रकारानंतरही तिने ड्रायव्हरला दोष दिला नाही. कदाचित त्याला भूक लागली असेल. त्यामुळे माझं जेवण खाल्लं असेल, असं ती म्हणाली होती. 

 

टॅग्स :Uberउबरfoodअन्नSocial Viralसोशल व्हायरल