शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

थरारक व्हिडीओ, भीषण अपघातात ट्रकचे २ तुकडे झाले; ड्रायव्हरचं काय झालं? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 11:52 IST

गाडी पलटल्यामुळे वाहन चालकाचा मृत्यू झाला असेल असं वाटेल. हा व्हिडीओही ओवरलोडिंग झालेल्या ट्रकचा आहे

सध्या एक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियात याच व्हिडीओवर अनेकांची चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ पाहून IFS अधिकारी सुशांत नंदाही चक्रावले. रस्ते अपघातातील ट्रकची झालेली अवस्था पाहून अंगाचा थरकाप उडेल. इतका भीषण हा अपघात घडला आहे.

एका कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात घडला. त्यात ट्रकचे २ भाग झाले. हा व्हिडीओ खूप भयंकर आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ट्रक, कंटेनर नेहमी ओवर लोडिंग केले जातात. त्यामुळे बरेच अपघात घडल्याचं पाहायला मिळालं आहे. गाडी पलटल्यामुळे वाहन चालकाचा मृत्यू झाला असेल असं वाटेल. हा व्हिडीओही ओवरलोडिंग झालेल्या ट्रकचा आहे. ज्यात क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने तो पलटी होतो आणि ट्रकचे २ तुकडे होतात.

व्हिडीओत काय आहे?

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ओवर लोडिंग ट्रक कच्च्या रस्त्याने जात असतो. पावसामुळे रस्त्यावर मोठा चिखल झालेला दिसतो. ट्रकमध्ये प्रचंड सामान असतं. जेव्हा वळणावरुन हा ट्रक जात असतो तेव्हा त्याचं नियंत्रण सुटतं आणि तो पलटी होतो. व्हिडीओ पूर्ण पाहिला तर त्याच्या भीषणतेचा अंदाज येऊ शकेल. ट्रक एका बाजूला पडलेल्या गवताच्या ढिगाकडे जातो. या अपघातात ड्रायव्हर ढिगाऱ्यात दबल्याने मृत्यू झाला असावा असं व्हिडीओ पाहून वाटेल.

ट्रकाचे २ तुकडे होतात

व्हिडीओनुसार, ट्रकच्या वरील भाग पूर्णपणे विखुरला जातो. आणि पुढील भाग चालूच राहतो. तेव्हा पुढील भाग रोखण्यासाठी ड्रायव्हर मागे मागे धावताना दिसून येतो. हा व्हिडीओ शेअर करत आयएफएस अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, आत्मा शरीराचा त्याग करतोय. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून कमेंट्स केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल