couple romance train video: सोशल मीडियाच्या जगात आपण दररोज अविश्वसनीय गोष्टी पाहतो. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे लोकांना आश्चर्यचकित करून नवीन पातळीवर घेऊन जातात. अलिकडे, असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि एक तरुणी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या मालगाडीखाली बसलेले दिसतात आणि मिठी मारताना दिसतात. क्लिपचा शेवट अतिशय धक्कादायक होते ज्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसेल.
व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांच्या हातात हात घालून रेल्वे रुळांवर आरामात बसलेले दिसत आहेत. तरुणी पिवळी साडी नेसून बसलेली दिसते आणि मुलगा तिला मिठी मारताना दिसतो. त्यांच्याभोवती कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांना वाटते की कोणीही आपल्याला पाहत नाही. त्यांच्या अगदी वर एक मोठी मालगाडी उभी असते. सुरुवातीला तरुण-तरुणी एकमेकांना मिठी मारून आणि गळाभेट घेताना दिसतात. काही क्षणांनंतर, मालगाडी अचानक हळूहळू पुढे जाऊ लागते. वर एक मोठा आवाज येतो. प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्याला अचानक कळते की मालगाडी सुरू झाली असून त्यांच्या डोक्यावरून जाऊ शकते. ते घाबरतात आणि लगेच रुळावरून मागे सरकतात. पाहा व्हिडीओ-
काही सेकंदांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील घटना पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. व्हिडिओ पाहणारे अनेक प्रेक्षक हे दृश्य पाहून थक्क होतात. लोक या व्हिडीओवर खूप कमेंट करत आहेत.
Web Summary : A viral video shows a couple romantically embracing under a stationary train. The train suddenly starts moving, forcing them to escape narrowly. The shocking clip has stunned viewers.
Web Summary : एक वायरल वीडियो में एक जोड़ा खड़ी ट्रेन के नीचे रोमांस करते हुए दिख रहा है। अचानक ट्रेन चलने लगती है, जिससे वे बाल-बाल बच जाते हैं। चौंकाने वाले दृश्य देखकर लोग दंग रह गए।